AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Work From Home | ‘वर्क फ्रॉम होम’ करून हाताची बोटं दुखतायत? मग, ‘हे’ उपाय नक्की ट्राय करा!

संगणक आणि लॅपटॉपवर सातत्याने काम केल्यामुळे लोकांमध्ये बर्‍याच प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.

Work From Home | ‘वर्क फ्रॉम होम’ करून हाताची बोटं दुखतायत? मग, ‘हे’ उपाय नक्की ट्राय करा!
जर तुम्ही कोटक महिंद्रा बँकेकडून 20 वर्षांसाठी 30 लाखांचे कर्ज घेतले तर तुम्हाला दरमहा 22,663 रुपये ईएमआय 6.65% दराने भरावा लागेल.
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Jan 12, 2021 | 1:45 PM
Share

मुंबई : कोरोना साथीच्या वेळी बहुतेक लोक घरातूनच काम करत आहेत. यामुळे लोक कॉम्प्यूटर आणि लॅपटॉपवर अधिकाधिक वेळ घालवत आहेत. संगणक आणि लॅपटॉपवर सातत्याने काम केल्यामुळे लोकांमध्ये बर्‍याच प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. यापैकी सर्वात सामान्य समस्या म्हणजे हातांच्या बोटांमध्ये होणाऱ्या वेदना. संगणकावर काम करत असताना कंबर किंवा मान दुखणे ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु, असे बरेच लोक आहेत ज्यांना सध्या हातांच्या बोटांमध्ये वेदना होण्याचा त्रास होऊ लागला आहे (Work From Home hand and finger stretching exercise).

बरेच दिवस कीबोर्ड आणि माऊसचा वापर केल्याने हात व बोटं कमजोर होऊ शकतात. अगदी बोटाच्या टोकांवर थोड्याशा दबावामुळे देखील आपल्याला वेदना जाणवू शकतात. काही व्यायाम आणि टिप्सचा उपयोग करून आपण या समस्येतून आराम मिळवू शकता.

संगणकाची उंची आणि हातांची स्थिती

आपण जिथेही काम करता, सर्वात प्रथम त्या जागेची उंची तपासा. संगणक किंवा लॅपटॉप आपल्या डोळ्यांच्या रेषेत समांतर असल्याची खात्री करण्याचा प्रयत्न आपण नेहमीच केला पाहिजे. याव्यतिरिक्त, हाताचे मनगट सपाट पृष्ठभागावर कीबोर्डच्या समांतर ठेवले पाहिजे (Work From Home hand and finger stretching exercise).

ब्रेक घेऊन हात मोकळे करा.

सतत काम करत असताना काही वेळाची विश्रांती घेणे आवश्यक आहे. यामुळे आपल्या बोटांवरील ताण कमी होतो आणि अशा प्रकारे आपल्याला वेदनांपासून आराम देखील मिळतो. या ब्रेकदरम्यान बॉडी स्ट्रेच करून आपण इतर कोणत्याही समस्येपासून देखील मुक्त होऊ शकाल. यावेळी 5 ते 10 मिनिटे हातांचा व्यायाम करा.

मनगटांचा व्यायाम करा.

हाताची मुठ बंद करून डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे अस सुमारे दहा वेळा मनगट हळूवारपणे फिरवा. कमीतकमी दोन तासांत एकदा या व्यायामाची पुनरावृत्ती करा. दुसरा एखादा व्यायामसुद्धा तुम्ही करून पाहू शकता. यासाठी आपल्या उजव्या आणि डाव्या हाताच्या बोटांना इंटरलॉक करा आणि नंतर आपला हात हळूवारपणे वर खेचा. जर, आपल्याला बोटांनी वेदना होत असेल, तर आपण आपली मुठ देखील बंद करू शकता आणि नंतर ती उघडू शकता. थोड्या काळासाठी हा व्यायाम करू शकता. यामुळे आपल्याला वेदनांमधून आराम मिळेल.

(Work From Home hand and finger stretching exercise)

हेही वाचा :

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...