AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Gold: बावनकशी सोनं 49 हजार 520 वर

नाशिकच्या सराफा बाजारपेठेमध्ये मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 49 हजार 520 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 280 रुपये नोंदवले गेले.

Nashik Gold: बावनकशी सोनं 49 हजार 520 वर
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 5:21 PM
Share

नाशिकः नाशिकच्या सराफा बाजारपेठेमध्ये मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 49 हजार 520 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 280 रुपये नोंदवले गेले.

नाशिकच्या सराफा बाजारात रविवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48 हजार 450 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 75 रुपये नोंदवले गेले, तर चांदीचे दर किलोमागे 67 हजार रुपये होते. सोमवारी मात्र, सोन्याचे दर वाढले. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 49 हजार 250 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 280 रुपये नोंदवले गेले. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 49 हजार 520 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 280 रुपये नोंदवले गेले. दरम्यान, पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हॉलमार्किंग शुल्कचा उल्लेख आवश्यक

BIS च्या संकेतस्थळावर नमूद केल्याप्रमाणे ज्वेलर्स किंवा किरकोळ विक्रेत्याकडून प्राप्त झालेल्या बिल / इनव्हॉइसमध्ये हॉलमार्क केलेल्या वस्तूंचा तपशील असणे आवश्यक आहे. हॉलमार्क केलेल्या मौल्यवान धातूच्या वस्तूंच्या विक्रीचे बिल किंवा इनव्हॉइसमध्ये प्रत्येक वस्तूचा तपशील, मौल्यवान धातूचे निव्वळ वजन, कॅरेट, शुद्धता आणि हॉलमार्किंग शुल्क नमूद केले पाहिजे. अनेक दुकानदार ग्राहकांना कच्ची बिले किंवा तात्पुरती बिलेही देतात. तात्पुरते बिल हे असे असते जे व्यापाऱ्याने एखाद्या वस्तूच्या खरेदीवर ग्राहकाला दिलेले असते जे व्यापार्‍याच्या ऑडिट किंवा लेजरमध्ये दाखवले जात नाही. त्यामुळे तो कर भरणे टाळू शकतो. येथे ग्राहक विविध प्रकारचे कर (आता जीएसटी) भरण्याचेही टाळतो. तात्पुरत्या बिलामध्ये फक्त ज्वेलरी स्टोअरचे नाव (ज्यामधून दागिन्यांचा तुकडा खरेदी केला गेला आहे) आणि तुम्ही खरेदी केलेल्या दागिन्यांची वस्तू दर्शवते. हे सहसा कोऱ्या कागदावर बनवले जाते. अशा व्यवहारातून काळा पैसा निर्माण होतो. त्यामुळे पक्क्या बिलात खरेदी केलेल्या सोन्याची शुद्धता, दागिन्यांचे नाव आणि कोड, तुम्ही किती सोन्यासाठी पैसे देत आहात. तसेच अतिरिक्त शुल्क जसे की मेकिंग आणि वेस्टेज चार्ज, ज्वेलर्सचा GST ओळख क्रमांक याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. (24 carat gold price at 49520 in Nashik bullion market)

इतर बातम्याः

बहुचर्चित कांदे-भुजबळ वादाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; प्रशासकीय कागदपत्रे मागवली

साहित्य संमेलन गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख नाही; भूमिपुत्रालाच डावलल्याने नाराजीचे सूर

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.