अलमट्टी धरणातून 5 लाख क्युसेक्सने विसर्ग सुरु, सांगलीतील पाणी ओसरणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी 5 लाख क्युसेक्सने विसर्ग (Almatti Dam) करण्याचे आदेश दिले. अलमट्टी धरणातून हा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

अलमट्टी धरणातून 5 लाख क्युसेक्सने विसर्ग सुरु, सांगलीतील पाणी ओसरणार
Follow us
| Updated on: Aug 08, 2019 | 6:02 PM

बेळगाव : कर्नाटकातील अलमट्टी धरणाचा (Almatti Dam) फुगवटा दूर करण्यासाठी जास्तीचा विसर्ग करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी 5 लाख क्युसेक्सने विसर्ग (Almatti Dam) करण्याचे आदेश दिले. अलमट्टी धरणातून हा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. हा विसर्ग वाढवल्यामुळे कृष्णा नदीचं पाणी महाराष्ट्रात कमी होऊन सांगलीतील पूर ओसरण्यास मदत होणार आहे.

कर्नाटकात कृष्णा नदीवर अलमट्टी धरण आहे. या धरणातून पुढे पाणी न सोडल्याने कृष्णा नदीने थैमान घातलंय. अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विनंती केली होती. लवकरच सांगलीतील पूर ओसरण्याची अपेक्षा आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पथकं वाढवली

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफ, राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ), भारतीय हवाई दल, नौदल, कोस्टल गार्डचे पथकं तैनात आहेत. कोल्हापूर परिसरात एकूण 22 मदत पथके कार्यरत आहे.

एनडीआरफ-5, नेव्ही-14, कोस्टगार्ड-1, आर्मी कॉलम -1, एसडीआरएफ-1 एवढ्या पथकांचा समावेश आहे. तसेच सांगलीमध्ये एकूण 11 पथके कार्यरत असून त्यामध्ये एनडीआरएफ-8, कोस्टगार्ड-2 आणि आर्मीच्या एका पथकाचा समावेश आहे.

मदतकार्यासाठी आणखी पथके मागविण्यात आली असून पाच पथके पुण्यापर्यंत पोहोचली आहेत. कोल्हापूर आणि सांगलीकडे येण्यास प्रत्येकी दोन पथके मार्गस्थ झाली आहेत. त्यातील एक पथक पुण्यात कार्यरत आहे.

कोस्टगार्डची आणखी दोन पथके कोल्हापूरमध्ये आणि नौदलाची पाच आणि एसडीआरएफची दोन पथके सांगलीमध्ये पोहोचत आहेत. गतिमान बचाव कार्यासाठी आणखी पाच एनडीआरएफ टीम मागविण्यात आल्या आहेत.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विशेष रेल्वे गाडी

कोल्हापूर आणि सांगली परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्तेवाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून मिरज आणि कराड दरम्यान विशेष रेल्वे चालवण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी मुख्यमंत्र्यांना कळविले आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.