नक्षलवादाशी लढाईत आपण मागेच, 571 जणांची हत्या, 239 पोलिस शहीद

नागपूर : गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात गेल्या 35 वर्षांपासून नक्षलवादी कारवाया सुरु आहेत. या कारवाया थांबवण्यासाठी आपल्या पोलिसांनी अनेक प्रयत्न केलेत. पण नक्षलवादाचा बिमोड झाला नाही. गेल्या 35 वर्षांत गडचिरोली, गोंदिया अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. अँटी-नक्षल ऑपरेशनच्या सूत्रांनी दिलेली माहिती नक्कीच धक्कादायक आणि सरकारचे डोळे उघडणारी आहे. 1980 पासून 571 निष्पाप लोकांची हत्या …

नक्षलवादाशी लढाईत आपण मागेच, 571 जणांची हत्या, 239 पोलिस शहीद

नागपूर : गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात गेल्या 35 वर्षांपासून नक्षलवादी कारवाया सुरु आहेत. या कारवाया थांबवण्यासाठी आपल्या पोलिसांनी अनेक प्रयत्न केलेत. पण नक्षलवादाचा बिमोड झाला नाही. गेल्या 35 वर्षांत गडचिरोली, गोंदिया अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. अँटी-नक्षल ऑपरेशनच्या सूत्रांनी दिलेली माहिती नक्कीच धक्कादायक आणि सरकारचे डोळे उघडणारी आहे. 1980 पासून 571 निष्पाप लोकांची हत्या नक्षलवाद्यांनी केली आहे.

2014 पासून वर्षानिहाय निष्पाप लोकांची हत्या :

२०१४ – १४ हत्या
३०१५ – १८ हत्या
२०१६ – २१ हत्या
२०१७ – १३ हत्या
२०१८ – ०९ हत्या
२०१९ – १२ हत्या

1980 पासून गडचिरोली आणि गोदिया जिल्ह्याच्या नक्षली भागात 571 निष्पाप लोकांचा नक्षलवाद्यांनी जीव घेतलाय. नक्षलवाद्यांविरोधातील ऑपरेशनमध्ये आतापर्यंत राज्यानं तब्बल 239 पोलीस गमावले आहेत. 1980 पासून नक्षलग्रस्त हिंसेत 239 पोलीस शहीद झाले आहेत.

2009 पासून शहीद झालेल्या पोलीसांची संख्या :

वर्ष – शहीद पोलीस
२००९ –    ५२
२०१०-     १०
२०११-     ०८
२०१२ –    १४
२०१३-     ०६
२०१४ –    ११
२०१५ –    ०२
२०१६ –    ०३
२०१७ –    ०३
२०१८ –    ००
२०१९ –    १५

1980 पासून म्हणूजेच गडचिरोली आणि गोंदियात नक्षलवाद फोफावू वागल्यापासून आतापर्यंत आपल्या पोलिसांनी 244 नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय. यात 2009 चं आजपर्यंतच्या इतिहासातलं देशातलं सर्वात मोठं नक्षलविरेधी ऑपरेशन
महाराष्ट्र पेलीसांनी राबवलं. 2009 साली आपल्या पोलिसांनी एकाच वेळी तब्बल 40 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. पण गेल्या 39 वर्षात नक्षलवाद्यांनी केलेल्या हिॅसाचारात मोठ्याप्रमाणात निष्पाप लोक आणि पोलिस शहीद झाले आहेत. त्यामुळेच नक्षलवाद्यांच्या या लढाईत आपण मागे पडलो की काय? असा प्रश्न आता काही लोक उपस्थित करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *