AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चर्चा तर होणारच! …म्हणून बाळाचं नाव ठेवलं ‘नाशिक’, कारण ऐकून तुम्ही म्हणाल… क्या बात है !

नुकत्याच एका महिलेची प्रसूती झाली असून बाळाचे नाव नाशिक ठेवण्यात आले आहे. नाशिक नामकरण करण्यामागील कारण चर्चेचा विषय ठरत आहे.

चर्चा तर होणारच! ...म्हणून बाळाचं नाव ठेवलं 'नाशिक', कारण ऐकून तुम्ही म्हणाल... क्या बात है !
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Mar 10, 2023 | 9:25 AM
Share

नाशिक : चांगल्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रसती व्हावी असा अनेकांचा कल असतो. मात्र, नुकतीच एक प्रसूतीची ( New Born Baby ) घटना समोर आली असून तिची चर्चा संपूर्ण रेल्वेच्या वर्तुळात होत असून नाशिकमध्ये सुद्धा होत आहे. त्याच्या मागचं कारण सुद्धा तितकेच खास आहे. नुकतेच एका नवजात बाळाचे नामकरण झालं आहे. त्याचं झालं असं, की मुंबईहून नेहमीप्रमाणे सेवाग्राम एक्सप्रेस धावू लागली होती. नाशिक स्टेशन ( Nashik Road Station ) जसं जसं जवळ येऊ लागलं तसं तसं एका महिलेला प्रसूतीकळा येऊ लागल्या. महिलेसोबत असलेल्या महिला तशा घोळका करूनच बसलेल्या होत्या, मात्र प्रसूती कळा सुरू होताच त्यांनी महिलेला रिंगण केले.

ही संपूर्ण लगबग जनरल डब्यात सुरू होती. त्याच वेळेला काही प्रवाशांनी दुसरीकडे प्रार्थना सुरू केली. महिलेसह बाळ सुरक्षित राहू देत. एकीकडे प्रसूती कळा सुरू असल्याने महिला जोरजोरात ओरडत होती, आणि दुसरीकडे प्रार्थना सुरू होती. त्यामध्ये जवळपास नाशिकरोड स्टेशन निघून गेले.

त्यानंतर महिलेने एका गुटगुटीत बाळाला जन्म दिला. आणि संपूर्ण डब्यात बाळ जन्मला आले म्हणून आनंदाचे वातावरण झाले. टाळ्यांचा कडकडाट झाला. महिलेसह बाळ सुरक्षित असल्याने त्यांनी कुठल्याही स्टेशनवर न उतरता आपला प्रवास सुरूच ठेवला.

बाळाला जन्म दिलेली महिला आणि सोबत असलेल्या महिला या मुंबईत केटरिंगचे काम करत होत्या. मुंबईवरून त्यांचा प्रवास सुरू झाला होता. त्या यवतमाळकडे चालल्या होत्या. आणि त्याच दरम्यान ही प्रसूतीची घटना समोर आली आहे.

खरंतर संपूर्ण डब्यात आनंदाचे वातावरण होते. इतर प्रवाशांनी महिलेला विचारले आता बाळाचे नाव काय ठेवणार. महिलेने तात्काळ प्रश्न केला. आता कोणतं स्टेशन गेलं. प्रवाशांनी उत्तर दिलं नाशिक. महिलेने लगेच सांगून टाकलं बाळाचे नाव नाशिक ठेवू.

खरंतर धावत्या रेल्वेत बाळाचा जन्म, आणि बाळाचे नामकरणही झाले. त्यामुळे बाळाचे नाव नाशिक ठेवल्याचे संपूर्ण प्रवासी डब्यात ही बाब समजली आणि प्रत्येक जण येऊन बाळाला पाहात होता आणि आपल्या परीने महिलेला मदत करत होता.

कष्टकरी महिला असल्याने महिलेला प्रवाशांनी आर्थिक मदतही केली. त्यामुळे नामकरण होत असतांना प्रवाशांनी भेट स्वरूपात महिलेला पैसे दिले. एकूणच ही संपूर्ण घटना सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये चर्चेचा विषय ठरली असून रेल्वेच्या वर्तुळातही जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

रेल्वेतील संपूर्ण वातावरणच बाळाच्या जन्मानंतर बदलून गेला. संपूर्ण रेल्वेत आनंदाचे वातावरण होते. त्यात नाशिक असं नाव ठेवल्याने अधिक चर्चा होऊ लागली आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट