Abhijeet Dipke : मोठं काही तरी ठरणार? कॉक्रोच जनता पार्टीने बोलावली महत्त्वाची बैठक; अभिजीत दीपकेंनी सगळा अजेंडाच सांगितला

अभिजीत दीपके यांनी बुधवारी सीजेपीचं बैठक आयोजित केल्याची माहिती दिली. या बैठकीत विषयावरही त्यांनी भाष्य केलं.

Abhijeet Dipke : मोठं काही तरी ठरणार? कॉक्रोच जनता पार्टीने बोलावली महत्त्वाची बैठक; अभिजीत दीपकेंनी सगळा अजेंडाच सांगितला
| Updated on: Aug 03, 2026 | 12:29 PM

अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वातील कॉक्रोच जनता पार्टी आंदोलनानंतर पुन्हा सक्रिय झाली आहे. सीजीपेच्या दीपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथील राहत्या घरी बुधवारी महत्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कॉ़क्रोच जनता पार्टीची पुढील वाटचाल ठरवण्यात येणार आहे. याही पुढे लोक चळवळीच्या माध्यामातूनच सीजेपी काम करणार असल्याचे दीपकेंनी स्पष्ट केले. त्यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याचे दावे फेटाळून लावले. यावेळी दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांची शैक्षणिक डिग्री सार्वजनिक करण्याचे आव्हान दिलं.

अभिजीत दीपके यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. दीपके म्हणाले, ‘कॉक्रोच जनता पार्टीची बैठक पाच तारखेला होईल. माझ्या छत्रपती संभाजीनगर येथील राहत्या घरी ही बैठक होईल. या बैठकीत प्रवक्ते, कोर कमिटी सदस्य येतील. या बैठकीत सीजेपीची चळवळ कशी चालवायची, याविषयी चर्चा करू’. तर अभिजीत दीपकेंच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यावर बोलताना दीपके म्हणाले, ‘माझ्या शैक्षणिक खर्चावर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. त्यावर माझं म्हणणं आहे की, मी माझं स्कॉलरशिपचे पत्र आणि शैक्षिणिक कर्जाचं पत्र दाखवायला तयार आहे. पंतप्रधान मोदींनीही त्यांची शैक्षणिक डिग्री सार्वजनिक करावी. त्यांनी त्यांची डिग्री सार्वजनिक केल्यावर तात्काळ मी माझे स्कॉलरशिप आणि शैक्षणिक कर्जाचं पत्र सार्वजनिक करायला तयार आहे’.

‘माझी काय चौकशी करायची आहे, ती करा. जेव्हा सरकारच्या विरोधात कोणी बोलतो, त्याच्यासोबत या गोष्टी होतात. मी पहिला व्यक्ती नाही. सरकारला प्रश्न विचारल्यास ईडी, सीबीआय पाठवणे सुरू करतात. ईडी, सीबीआय पाठवा, मी स्कॉलरशिप आणि शैक्षणिक कर्जाचं पत्र दाखवायला तयार आहे. तुम्ही ईडीला पाठवत असाल, तर पंतप्रधानांनी त्यांच्यासोबत शैक्षणिक डिग्री देखील दाखवावी. त्यांनी त्यांची डिग्री सार्वजनिक करावी. मी माझी डिग्री सार्वजनिक करतो, असे ते म्हणाले.

‘झारखंडच्या पेपरफुटीवर अभिजीत दीपके म्हणाले, ‘कॉक्रोच जनता पार्टी ही झारखंडच्या विद्यार्थ्यांसोबत आहे. त्यांच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत मागे सरकू नये. जी मदत लागेल, कॉक्रोच जनता पार्टी द्यायला तयार आहे. आम्ही त्यांच्या मागण्याचं समर्थन करतो, असे त्यांनी सांगितले. पुढे म्हणाले, ‘अजेंडा ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे, सीजेपी पुढील वाटचाल कशी करेल, यासाठी बैठक बोलावली आहे. राजकीय पक्ष स्थापन करावा, यासाठी माध्यम उत्सुक आहे. तुम्ही कोणत्या पक्षावर नाराज दिसताय. आम्हाला जनआंदोलनच ठेवायचं आहे. राजकीय पक्ष स्थापन करून काय करायचं… लोकांचा राजकारणावर विश्वास कमी होत चालला आहे. लोक सकाळी मतदान एकाला देतात. त्यानंतर संध्याकाळी सरकार दुसऱ्यांचं स्थापन होते. लोक सकाळी आमदार-खासदार निवडतात. त्यानंतर संध्याकाळी तो आमदार- खासदार दुसऱ्याच पक्षात असतो’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us