अभिजीत दिपकेंना थेट विचारलं, फंडिंग कुठून येतं? प्रश्न विचारताच संतापले; PM CARES चा उल्लेख करत म्हणाले- कालच १० कोटी…

Abhijeet Dipke CJP Funding Viral Video: एका सामान्या नागरिकाने अभिजीत दिपकेंना फंडिंगचा हिशोब विचारला. त्यानंतर दिपकेंनी दिलेले उत्तर चर्चेचा विषय बनलं आहे.

अभिजीत दिपकेंना थेट विचारलं, फंडिंग कुठून येतं? प्रश्न विचारताच संतापले; PM CARES चा उल्लेख करत म्हणाले- कालच १० कोटी...
| Updated on: Oct 10, 2026 | 3:53 PM

दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉकरोच जनता पक्ष आंदोलन करत आहे. आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या १,५०० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. युट्युबर ध्रुव राठीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस ड्रोनच्या साहाय्याने अनेक भागांवर सतत पाळत ठेवत आहेत. जंतर मंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क आहे. तर आता याच वेळी अभिजीत दिपकेंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ते सीजेपीला मिळणाऱ्या फंडिंगवर बोलत आहेत.

अभिजीत दिपकेंचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एका सामान्य व्यक्तीने त्यांना फंडिंग कुठून मिळते, असा थेट प्रश्न विचारला. या प्रश्नावर अभिजीत दिपकेंनी दिलेल्या उत्तराची आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. व्हिडीओमध्ये संबंधित व्यक्ती फंडिंगच्या स्रोताबाबत विचारणा करताना दिसते.

Loading...

त्यावर अभिजीत दिपकेंनी कालच पीएम केअरमधून १० कोटी आले आहेत. हवं तर तुम्ही आयटीआर टाका, असं उत्तर दिल्याचं दिसत आहे. या उत्तरादरम्यान ते संतापल्याचंही व्हिडीओमध्ये दिसून आले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. फंडिंगच्या स्रोताबाबत विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरामुळे हा प्रसंग चर्चेचा विषय ठरला आहे.

तर दुसरीकडे दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनाला आक्रमक वळण आले आहे. पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांनी सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके, पक्षाचे सह-संयोजक सौरभ दास आणि सीजेपी नेते आशुतोष रांका यांना विमानतळावर ताब्यात घेतले आहे. प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठीलाही गुरुग्राममधील त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले.

टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी आणि पक्षाचे इतर नेते दिल्लीतील साऊथ ॲव्हेन्यूवर आंदोलन करत होते. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफने ममता बॅनर्जी, डेरेक ओ’ब्रायन, डोला सेन, प्रतिमा मंडल आणि समीरुल इस्लाम यांना ताब्यात घेतले. त्या सर्वांना तुरुंगाच्या व्हॅनमधून पोलीस ठाण्यात नेले जात आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजय सिंह, सौरभ भारद्वाज आणि दुर्गेश पाठक यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us