लोकांसोबत संवाद साधत असतानाच अभिजीत दिपकेंना मळमळ आणि उलट्या, प्रकृती खालावली, डॉक्टरांनी..
कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्याबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे येतंय. अचानक अभिजीत दिपके यांची तब्येत खालावली आहे. अभिजीत दिपकेंना मळमळ आणि उलट्या सुरू झाल्याची माहिती आहे.

कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन जंतर मंतरवर केले. अमेरिकेतून भारतात दाखल होत अभिजीत दिपकेने मोठे आंदोलन उभारले. तब्बल काही दिवस आंदोलन सुरू होते. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू होते. अखेर सरकारला आंदोलनांपुढे झुकावे लागले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, यादरम्यान अभिजीत दिपके यांची तब्येत खालावल्याचे बघायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच अभिजीत दिपके छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या घरी परतले. खूप मोठे यश कॉकरोच जनता पार्टीला मिळाले. अभिजीत दिपके भाजपावर काही गंभीर आरोप करतानाही दिसले. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला देशभरातून समर्थन मिळाले. अभिजीत दिपके छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर अनेक लोक भेटीसाठी जात आहेत.
आता अभिजीत दिपके याच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट पुढे येताना दिसत आहे. अभिजीत दीपके यांची तब्येत खालावली आहे. भेटीसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत असताना अभिजीत दीपके यांना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. तब्येत बिघडल्याने त्यांनी भेट अर्धवट सोडली आणि उर्वरित नागरिकांना न भेटताच दिपके घरात परतले.
सध्या डॉक्टरांकडून अभिजीत दिपके यांच्यावर घरीच उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. जंतर मंतरवरील आंदोलनानंतर अभिजीत दिपकेवर उपचार सुरू होते. त्यानंतर तब्येत सुधारली होती. पण आता अचानक अभिजीत दिपके यांची तब्येत खालावल्याचे बघायला मिळत आहे. त्यातच नागरिकांसोबत संवाद साधत असताना पुन्हा तब्येत खालावली आहे.
संवाद अर्धवट सोडून घरात अभिजीत दिपके केले आहेत. आता अभिजीत दिपकेंवर उपचार सुरू असल्याची माहिती पुढे येतंय. अभिजीत दिपकेंकडून भाजपावर जोरदार टीका करण्यात आली. हेच नाही तर मला भाजपाकडून मोठी ऑफर पक्षात सहभागी होण्याची देण्यात आल्याचेही अभिजीत दिपकेने म्हटले. कॉकरोच जनता पार्टीला अगदी कमी कालावधीमध्ये मोठी प्रसिद्धी मिळाली. सरकारविरोधात मोठा लढा अभिजीत दिपकेंच्या पार्टीने लढला आहे.