AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहिल्यानगरमधून कोण गाठणार विधान परिषद? एकूण किती मतदार, कोणत्या पक्षाची ताकद जास्त? वाचा…

Ahilyanagar MLC Election : अहिल्यानगर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक तब्बल चार वर्षांनंतर होत आहे. कोणत्या पक्षाची किती ताकद आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

अहिल्यानगरमधून कोण गाठणार विधान परिषद? एकूण किती मतदार, कोणत्या पक्षाची ताकद जास्त? वाचा...
Ahilyanagar MLC ElectionImage Credit source: Google
| Edited By: बापू गायकवाड | Updated on: May 19, 2026 | 5:21 PM
Share

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 16 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, अहिल्यानगरमध्येही राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून गेलेले आमदार अरुण जगताप यांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपला होता, त्यानंतर तब्बल चार वर्षांनी ही निवडणूक प्रक्रिया होत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित असल्याने मतदारसंख्या कमी झाली असून, सध्या या निवडणुकीत 461 मतदार मतदान करणार आहेत. ही आमदारकी आपल्या पक्षाकडेच राहावी यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे चित्र आहे.

2022 नंतर निवडणूक

अहिल्यानगर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक तब्बल चार वर्षांनंतर होत आहे. यापूर्वी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अरुण जगताप हे या मतदारसंघाचे आमदार होते. त्यांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपल्यानंतर ही निवडणूक रखडली होती. त्याचवेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही झालेल्या नसल्याने सध्या केवळ महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींचे सदस्यच मतदार असणार आहेत.

अहिल्यानगरमध्ये कोणत्या पक्षाचे किती मतदार?

अहिल्यानगर या मतदारसंघात एकूण 461 मतदार असून, त्यामध्ये भाजपकडे सर्वाधिक 199 सदस्यसंख्या आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे सुमारे 50 सदस्य आहेत. विजयासाठी आवश्यक असलेला आकडा 231 मतांचा आहे. गेल्या वेळी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. मात्र यावेळी भाजपकडूनही या जागेवर जोरदार दावा केला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही ही जागा कायम राखण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

मोर्चेबांधणी सुरू

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अनेक वर्षांनंतर ही निवडणूक होत असल्याने इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे बोलले जात आहे. अद्याप कोणत्याही पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नसला तरी इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. उमेदवारी आपल्या पदरात पडावी यासाठी राजकीय लॉबिंगलाही सुरुवात झाली आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना पक्ष श्रेष्ठींकडून आश्वासने दिली जातात. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात हे चित्र नेहमीच पाहायला मिळते. मात्र एकाच पक्षातून अनेक इच्छुकांना शब्द दिले जात असल्याने अखेर उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते आणि विजयाचा गुलाल कोण उधळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...