अमित शाहांवर एकेरी भाषेत टीका, शिंदेंचा रावण म्हणत उल्लेख; अहमदनगरमध्ये संजय राऊतांची जाहीर सभा

| Updated on: Apr 26, 2024 | 6:26 PM

Sanjay Raut Sabha in Akola Loksabha Election 2024 Statement About Amit Shah : अहमदनगरच्या अकोल्यामध्ये संजय राऊत यांची जाहीर सभा होत आहे. या सभेत बोलताना संजय राऊत यांनी अमित शाहांवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत या ठिकाणी काय म्हणाले? वाचा सविस्तर...

अमित शाहांवर एकेरी भाषेत टीका, शिंदेंचा रावण म्हणत उल्लेख; अहमदनगरमध्ये संजय राऊतांची जाहीर सभा
Follow us on

महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौर यांच्या प्रचाराचा निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांची सभा सभा झाली. या सभेला बाळासाहेब थोरात आणि शंकरराव गडाख उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी सभेला संबोधित केलं. महाराष्ट्र देशाच्या कोणत्याही लढ्यात प्रामाणिकपणा पुढे असतो. म्हणून नरेंद्र मोदी महाराष्ट्राला घाबरतात. अमित शाहा कोणाला घाबरत असेल तर महाराष्ट्राला… अमित शाह रोज महाराष्ट्रात येतो. कारण त्याला भीती त्याला वाटते की, आपली सत्ता उलथवून टाकायची धमक महाराष्ट्रात आहे. आता तर मशाल पेटली आहे. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. मी आम्ही संसदेत सांगितलं होतं की आप जिस स्कूल मे पाढते हो उस्के हेडमास्टर हम है!, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊतांची सभा

मी जेव्हा सभेला आलो तेव्हा ऊन होतं आणि आता दिवस मावळतील लागला आहे. दिल्लीत शेतकरी आंदोलन होण्याआधी इथे आंदोलन झालं. ज्या भागात डावी चळवळ असते. तो भाग एक तर आदिवासींचा असतो. गरीब शेतकऱ्यांचा असतो. ती चळवळ मला इथे दिसते. दिल्लीत सीमेवर ऊन वारा पाऊस थंडीत शेतकरी बसले होते, असं संजय राऊत म्हणाले.

शिंदेंवर घणाघात

हिंदू मुसलमान करायला तुम्हाला मंगळसूत्र लागतं. तुम्ही कसले हिंदु? हे तर ढोंगी आहेत. ते कोण आले देवेंद्र फडणवीस आले. गाणं कोणतं लावाल? रामाच्या हातात धनुष्यबाण आहे. त्यांना हे माहिती नाही नवीन रामायण आहे. राम आयेंगे. तो अंगणा सजायेंगे… किसान आयांगे तो खिले सजायेंगे… राम हा अयोध्येचा राजा होता. राम वनवासाला जाताना शेतकरी सीमेवर सोडायला आले. जेव्हा धनुष्यबाण रावणाच्या हातात गेला तेव्हा रामाने मशाल हाती घेतली, असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाचा रावण असा उल्लेख केला आहे.

मोदींवर निशाणा

भाऊसाहेब वाकचौर यांचं रामा प्रमाणे आगमन झालं आहे. शिवसेना हीच अयोध्या आहे एकदा शिवसेना सोडली की परत निवडून येत नाही. दादा कोंडके यांचा सिनेमा होता एकटा जीव सदाशिव… तसे ते एकटा जीव सदाशिव असाच त्यानं फिरवं लागणार आहे. मी राहुल गांधी बरोबर ३५ किमी चाललो. पठाण कोट ते जम्मू कश्मीरपर्यंत चाललो. नरेंद्र मोदींच्या भाषेत घराणेशाही घेवून हो त्या घराण्याला एक परंपरा आहे. ज्याला घरच नाही त्याला काय परंपरा असणार? मशाल पटेल आणि देशाला दिशा दाखवेल, असं संजय राऊत म्हणाले.