Ashok Kharat: भोंदू खरातचा अजून एक कारनामा, देवदर्शनाचा बनाव अन्…यंत्रणांच्या हाती मोठे घबाड
Ashok kharat Samata Patsanstha: भोंदू अशोक खरात याचा अजून एक कारनामा पुढे आला आहे. त्याच्या प्रकरणात एकमागून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. त्याच्या करारनाम्याने यंत्रणाही हादरल्या आहेत. काय आहे ती मोठी अपडेट?

Ashok kharat Samata Patsanstha: महिलांचे लैंगिक शोषण, व्यापारी, व्यावसायिकांना भीती घालवून गंडवणे, राजकारण्यांचा वापर करून फायदा मिळवणे असे एकामागून धक्कादायक प्रकार समोर येत आहे. त्याच्या करानाम्याची शेपटी वाढतच चालली आहे. त्याने भाविक भक्तांच्या ओळखपत्रांचा वापर करून पतसंस्थेत बोगस खाती उघडल्याचे समोर आले आहे. त्यामाध्यमातून तो त्याचे आर्थिक व्यवहार करत होता. आधार कार्ड, पॅनकार्डचा गैरवापर करत त्याने त्याचे आर्थिक व्यवहार केल्याचे समोर येत आहे.
पॅन कार्ड, आधारकार्डचा वापर, 57 बनावट खाती
पॅन कार्डच्या माध्यमातून बनावट सह्यांचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. भोंदू अशोक खरातचा अजून एक कारनामा समोर आला आहे. खरातने समता पतसंस्थेत 57 बनावट खाती उघडल्याचे समोर आले आहे. भक्तांकडून घेतलेल्या पॅन कार्डचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पॅन कार्डवरील सहीशी, स्वाक्षरीशी साम्य साधत खाती उघडल्याचा प्रकार समोर येत आहे. पोलिस तपासात याविषयीचा मोठा खुलासा समोर आला आहे.
35 खात्यांची चौकशी पूर्ण ; 90% सह्या संशयास्पद
भोंदू खरातने या पतसंस्थेत उघडलेल्या 35 खात्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. तर 90% स्वाक्षरी या संशयास्पद असल्याचे तपासात समोर आले आहे. भोंदू खरातने देवदर्शनाच्या नावाखाली आधार आणि पॅन कार्ड गोळा केल्याचे समोर आले आहे. बनावट सह्यांच्या आधारे मोठे आर्थिक व्यवहार होत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उर्वरीत खातेदारांना चौकशीसाठी शिर्डी पोलिस नोटीसा बजावणार आहे.
चाकणकरांना पोलिसांचे अभय?
रुपाल चाकणकर आणि प्रतिभा चाकणकर यांना आरोपी करणं गरजेचं आहे असे रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या. पोलीस जाणीवपूर्वक चाकणकरांना अभय देत असल्याचा गंभीर आरोपी सुद्धा ठोंबरे यांनी केला. रूपाली चाकणकर यांना पोलीस जाणीवपूर्वक वाचवत आहे. खात्याचा नॉमिनी घरातला व्यक्ती असायला पाहिजे ती नसून प्रतिभा चाकणकरचा नॉमिनी अशोक खरात आहे. याप्रकरणी दोघींवर कारवाईची मागणी त्यांनी लावू धरली.
रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकर यांना आरोपी करणं गरजेचं आहे. आम्हाला समाजातील ही घाण ही किड विकृती संपवायची आहे. पोलीस त्यांना जाणीवपूर्वक एक वेगळं अभय देत आहेत. चांगली ट्रीटमेंट देत आहे ते कोणामुळे देत आहेत कोण सांगते तुम्हाला तुम्ही कायद्याचे रक्षक आहात कायद्यानुसार कारवाई करायला पाहिजे. चाकणकर या अत्यंत धूर्त गुन्हेगार वृत्तीची बाई असल्याचा आरोप करून ठोंबरे यांनी खळबळ उडवून दिली.