AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अमरावतीत लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठा ट्विस्ट; तरुणींवर अत्याचार करणारा निघाला एमआयएमचा पदाधिकारी, काय ती धक्कादायक बातमी

Amravati Paratwada Molestation Case: अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी हा एमआयएम पक्षाचा पदाधिकारी असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. काय आहे याविषयीची मोठी अपडेट?

मोठी बातमी! अमरावतीत लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठा ट्विस्ट; तरुणींवर अत्याचार करणारा निघाला एमआयएमचा पदाधिकारी, काय ती धक्कादायक बातमी
अमरावती परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Apr 14, 2026 | 2:36 PM
Share

Amravati Molestation Case: अमरावतीच्या परतवाडा शहरातील मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर नावाच्या युवकाने अनेक तरूणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांना फसवून ब्लॅकमेल केले. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याने १८० तरुणींचे लैंगिक शोषण केले. ३५० व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केला. भोंदू खरातनंतर या प्रकरणाने राज्यात खळबळ उडवून दिली. आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर वर गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे. आता याप्रकरणात अजून एक मोठा ट्विस्ट आला आहे. आरोपी हा एमआयएम पक्षाचा पदाधिकारी असल्याचा दावा करण्यात येत आहे.

आरोपीवर गुन्हा दाखल

अमरावतीच्या परतवाडा शहरातील मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर नावाच्या युवकाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीचा मोबाईल ताब्यात घेऊन, तपासाला सुरुवात केली आहे. अनेक धक्कादायक अश्लील व्हिडियो त्याच्या मोबाईलमध्ये असल्याची माहिती सुत्रांनी दिलेली आहे. आरोपीने हे व्हिडिओ इतर मित्रांना पाठवले का याचाही शोध पोलीस घेत आहे. आरोपी तरुणाचे तरुणींसोबतचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आरोपी निघाला एमआयएमचा पदाधिकारी

अमरावतीच्या परतवाडा येथील मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील मुख्य आरोपी MIM पक्षाचा पदाधिकारी निघाला. MIM चे शहराध्यक्ष हाजी इरफान खान यांच्याकडून नियुक्तीपत्र स्वीकारतानाचे अयाज चे व्हिडिओ आणि फोटो आता समोर आले आहेत. अयाज याने गेल्या महापालिका निवडणुकीवेळी बडनेरा येथे झालेल्या असदुद्दीन ओवीसी यांच्या सभेच्या स्टेजवर उपस्थित राहून रिल्स शूट केल्याचेही समोर आले आहे. आरोपी अयाजच्या Instagram वर या संदर्भातील व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते. मात्र सध्या ते डिलिट केल्याचं निदर्शनास आले आहे.

7 ते 8 तरुणी सोबत फोटो व्हिडिओ

अमरावतीच्या परतवाडा मध्ये मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेला  मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला. आरोपीच्या मोबाईलमध्ये त्याचे 7 ते 8 तरुणी सोबत फोटो आणि व्हिडिओ आहेत. हे अश्लील व्हिडिओ आरोपीने व्हायरल केले की त्याच्या मित्राने व्हायरल केले हे मोबाईल तपासातून समोर येणार आहे. पीडित महिला ना आवाहन केलं आहे पुढं यावं. सायबरकडून माहिती घेतली जात आहे. पीडित महिलांची ओळख गुप्त ठेवली जाईल. आम्ही हेल्पलाईन नंबर दिले आहे. पालकानी पुढं यावं. भीती न बाळगता समोर यावं. कोणाचही नाव समोर येऊ देणार नाही. प्रकरणात आणखी आरोपी असतील तर तपास करू, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेश मस्के यांनी दिली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...