चार महिने झाले तरी…पिंकी माळींच्या कुटुंबाची उपेक्षा, VSR कंपनीवर गंभीर आक्षेप, वडील म्हणाले…

रोहित प्रवारांनी ट्वीट करून आमची समस्या मांडली असेल तर त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. ते वेळोवेळी आमची विचारपूस करतात, असे शिवकुमार माळी म्हणाले. तसेच पिंकी जाऊन चार महिने झाले. अजूनही पाठपुरावा करणे, दखल घेण्याचे काम रोहित पवार करत आहेत, असेही शिवकुमार माळी यांनी सांगितले.

चार महिने झाले तरी...पिंकी माळींच्या कुटुंबाची उपेक्षा, VSR कंपनीवर गंभीर आक्षेप, वडील म्हणाले...
pinki mali father shivkumar mali
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 03, 2026 | 10:05 PM

Pinki Mali : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान विपघातात मृत्यू झाला. त्या विमान अपघातात अजितदादांसोबत विमानाच्या फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला होता. अजितदादांच्या निधनाच्या वेळी पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची सर्व पद्धतीने मदत केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु या कुटुंबाला अद्याप मुख्यमंत्री सहायता निधी मिळालेला नाही. तसेच पिंकी माळी यांच्या कुुटुंबीयांना व्हीएसआर ही कंपनी पिंकी यांच्या इन्शुरन्सचे पैसेही देण्यास टाळाटाळ करत आहे, असा गंभीर आरोप शरद पवार यांच्या पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी केला होता. दरम्यान, आता रोहित पवार यांनी ट्वीटच्या माध्यमातून केलेल्या या आरोपानंतर पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार माळी यांनी आपली खदखद मांडली आहे. त्यांच्यासोबत नेमकं काय घडत आहे, याची सविस्तर माहिती त्यांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे.

तुम्ही मदतीचे अंतरिम अमाऊंट का घेत नाही?

रोहित प्रवारांनी ट्वीट करून आमची समस्या मांडली असेल तर त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. ते वेळोवेळी आमची विचारपूस करतात, असे शिवकुमार माळी म्हणाले. तसेच पिंकी जाऊन चार महिने झाले. अजूनही पाठपुरावा करणे, दखल घेण्याचे काम रोहित पवार करत आहेत. VSR कंपनीचे मालक व्ही के सिंग यांनी फोन केला होता. तुम्ही मदतीचे अंतरिम अमाऊंट का घेत नाही, अशी विचारणा त्यांनी केली होती. परंतु आम्हाला एकूण किती पैसे मिळतील, असे मी त्यांना विचारले होते, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच आमची मुलगी तर राहिली नाही. कमीत कमी तिचं जे काही मानधन आहे ते तरी आम्हाला सांगा, अशी मागणीही त्यांनी केली.

बारामतीमधून मला फोन आला होता

अंतरिम अमाऊंट घ्या. पिंकीच्या विम्याचे काम आम्ही करत आहोत, असे सांगितेल जात आहे. परंतु चार महिने झाले इन्शुरन्स काम करायला किती वेळ लागतो? असा सवालही त्यांनी केला. बारामतीमधून मला फोन आला होता. सोनवणे म्हणून आहेत त्यांचा तो फोन होता. त्यांनी पाच लाखाचं सहायता निधी मुख्यमंत्री निधीतून जाहीर झाल्याचे सांगितले होते. परंतु पाच लाख ही मदत खूप कमी आहे. ही मदत आम्हाला नको, असे मी त्यांना सांगितले, अशी माहितीही शिवकुमार माळी यांनी दिली.

मी पत्रव्यवहार केला पण…

त्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीतून एवढीच मदत जाहीर झाले आहे. तुम्हाला पाहिजे तर हे घ्या आणि पुढे मदत जास्त हवी असेल तर पाठपुरावा करा, असंही सोनवणे यांनी मला सांगितलं. त्यानंतर मी पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु पाठपुरावा होत असल्याचं काही दिसत नाही. मुख्यमंत्री सहायता निधीकडून आम्हाला मदत वाढवून मिळावी अशी आमची अपेक्षा होती. पण ते अजून काही दिसत नाही, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us