AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Plane Crash: राज्याला मोठा धक्का! विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू, विमान जळून खाक

Ajit Pawar Plane Crash Update: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. ताज्या अपडेट्सनुसार या विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचा आणि आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची अपडेट समोर येत आहे. तर विमान जळून खाक झालं आहे.

Ajit Pawar Plane Crash: राज्याला मोठा धक्का! विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू, विमान जळून खाक
अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Jan 28, 2026 | 12:55 PM
Share

Ajit Pawar Plane Crash Update: आज सकाळीच राज्याला हदरवणारी बातमी समोर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. ताज्या अपडेटनुसार, या विमान अपघातापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दादांन घेऊन जाणारं छोटं विमान हे जळून खाक झालं आहे. बारामती दौऱ्यासाठी ते आले होते. विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. या अपघातात दादांचं दोन सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताने राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

जिल्हा परिषद आणि पंचाय समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादांनी प्रचार सुरू केला होता. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आल्या होत्या. महानगर पालिका निवडणुकीचा निकाल पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्रचाराला वेग घेतला होता. हा अपघात नेमका कशामुळे झाला. तांत्रिक बाब काय, या सर्व प्रकरणाची चौकशी विमानतळ प्रशासनाने सुरू केली आहे.

लँडिंगदरम्यान विमान कोसळलं

हे छोटेखानी विमान लँडिंगदरम्यान विमान कोसळलं. विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. बारामतीमधील या भीषण विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती DGCA ने दिली आहे. लँडिंग करताना काही तांत्रिक दोषामुळे विमान कोसळले आणि त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. याठिकाणी धूराचे मोठे लोट आले. तर विमानाला मोठी आग लागली. त्यात हे विमान जळून खाक झाले. या भीषण अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आल्याने कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राला मोठा धक्का बसला.बारामती विमानतळाजवळील शेतात त्यांचे विमान कोसळले. विमानाला भीषण आग लागली. आज अजितदादांच्या चार सभा होत्या. त्यासाठी ते येत होते. दरम्यान हे विमान विमानतळाजवळील शेतात कोसळले. त्यावेळी लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. यंत्रणा ही धावल्या. पण अपघात अत्यंत भीषण होता. मुंबईवरून ते बारामतीसाठी निघाले होते. या विमान अपघाताने पवार कुटुंबियावर शोककळा पसरली आहे. तर राज्यालाही मोठा धक्का बसला आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तातडीने बारामतीकडे धाव घेतली. याठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. एक दिलखुलास, रोखठोक नेता या विमान अपघाताने हिरवला आहे. त्यांची प्रशासनावर मोठी पकड होती. या आठवणी आता कार्यकर्त्यांच्या मनात कायम घर करतील.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं