उपमुख्यमंत्री शिंदेंच्या गडामध्ये मनसेची मोठी तयारी, 9 ऑक्टोबरला… महत्त्वाची अपडेट समोर!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणामध्ये आता मोठी भूमिका जाहीर केली आहे. ९ ऑक्टोबरला सर्वपक्षीय मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता घडामोडींनी आणखी वेग घेतला आहे.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या गडामध्ये मनसेची मोठी तयारी, 9 ऑक्टोबरला... महत्त्वाची अपडेट समोर!
mns planned morcha in thane
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 03, 2026 | 5:07 PM

पूर्णेकर हत्या प्रकरणात मनसेचे नेते अविनाश जाधवांनी मोठा खळबळजनक आरोप केला आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत 49 हत्या झाल्याचा, यातील एक हत्या पोलिस कर्मचाऱ्याची आणि पाचवी हत्या बाळू पूर्णेकर यांची असल्याचा दावा करत त्यांनी वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे. ड्रग्स, पोलीस ठाण्यांमधील घटना आणि इतर गुन्ह्यांवर पोलिसांचा पुरेसा धाक दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवडणूक क्षेत्रात हा प्रकार घडतोय. ठाण्याचा आक्का कोण हे शोधणे गरजेचे आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. रात्री माजीवडा नाक्याजवळ मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याचा उल्लेख करत, पोलिसांच्या उपस्थितीतही परिस्थितीवर नियंत्रण नसल्याचा दावा केला अविनाश जाधवांनी केला आहे.

हत्येमागील कट समोर आला पाहिजे

पूर्णेकर हत्या प्रकरणातील सूत्रधार आणि हत्येमागील कट उघड करून आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेत शिक्षा मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ‘भयमुक्त ठाणे’च्या मागणीसाठी 9 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4 वाजता सर्वपक्षीय मोर्चा काढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. हा मोर्चा पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेण्याचे सांगितले आहे.

Loading...

याशिवाय त्यांनी ठाण्यातील ड्रग्सच्या समस्येचा मुद्दा उपस्थित करत, इंदिरानगरमधील कथित ड्रग्स सेवनाचा व्हिडिओ आणि तक्रारदाराला धमक्या दिल्याचा दावा केला; या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी पूर्णेकर हत्या प्रकरणात साथ दिल्याबद्दल अविनाश जाधव यांनी पत्रकारांचे आभार मानले आहेत.

..तर योग्य माणसाच्या घरावर मोर्चा नेऊ

दरम्यान, आज याप्रकरणी सर्वपक्षीय पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सर्व नेत्यांनी एकत्र येत आपली भू्मिका मांडली, यावेळी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. या सगळ्याचा विरोध आम्ही करणार आहोत. यामध्ये आम्ही सगळे, वकील संघटना, पक्ष, संघटना, हा सगळा मोर्चा आम्ही पोलिस आयुक्त कार्यालयावर काढणार आहोत. हे करुनही जर गुन्हेगारी थांबली नाही तर ठाण्यातील योग्य माणसाच्या घरावर आम्ही मोर्चा नेऊ असाही इशारा त्यांनी दिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us