अरे पुणेकरांना काय झाले… असा आवाज चालणार नाही.. अमित शाह यांचे भाषण तूफान चर्चेत..
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दाैऱ्यावर आहेत. अजित डोभाल यांना अमित शाह यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. अमित शाह यांच्या पुणे दाैऱ्यादरम्यान काँग्रेस आंदोलन करताना दिसले. यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनीही काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दाैऱ्यावर आहेत. शाहांच्या हस्ते अजित डोभाल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यादरम्यान बोलताना अमित शाह यांनी म्हटले की, अरे पुणेकरांना काय झाले.. असा आवाज चालणार नाही… यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय.. म्हणून मोठ्याने घोषणा देताना अमित शाह दिसले. यावेळी त्यांनी अजून मोठा आवाज पाहिजे, असल्याचे पुणेकरांना म्हटले. अमित शाह आपल्या भाषणा बोलताना म्हणाले की, टिळकांनी स्वराज्यासाठी आयुष्य खर्च केलं. त्यांनी स्वराज्याच्या आंदोलनासोबत जनतेला जोडण्याचं काम केलं. त्यांनी स्वातंत्र्यांच्या आंदोलनात नव्या प्रकारच्या राष्ट्रवादाला जन्म दिला. सांस्कृतिक राष्ट्रवादाची निर्मिती केली.
अनेक लोक राष्ट्रवादी आहेत. पण टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवयंती सुरू केली. देशाला कोणत्या मार्गाने जायचं याची दिशा दिली. हा देश जेव्हा स्वातंत्र्य होईल, तेव्हा याच मार्गावर चालेल. त्यांची दुरदृष्टी पाहा. देश आज सांस्कृतिक राष्ट्रवादावर चालत आहे. आता त्याला कोणी मागे खेचणार नाही. टिळक शिक्षक होते. प्रखर पत्रकार आहेत. ते निर्भिड होते. मोठे चिंतक होते. त्यांनी भारताची आत्म आणि विवेक जनतेसमोर आणण्याचं काम केलं.
पुढे अमित शाह यांनी म्हटले, मला गुजरातीत गीता मिळाली. टिळकांनी लिहिलंय. शिस्त आणि संविधानाच्या प्रतीचं असलेला भाव हा संविधानाचा भाग आहे. टिळकांचं काम पाहून महात्मा गांधीही म्हणायचे ते लोकमान्य होते. ते लोकप्रिय आहेत. आजच्या तरुणांसाठी टिळक प्रेरणादायी आहे. सर्वांना मी विनंती करतो टिळकांना वाचा. टिळकांची लेखणी कधीच कालबाह्य होणार नाही. जगाला नेहमी प्रेरणा देत नाही.
अमित शाह आज पुण्याच्या दाैऱ्यावर आहेत. राज्याचे लक्ष अमित शाह यांच्या पुणे दाैऱ्याकडे आहे. अजित डोभाल देखील पुण्यात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शाह यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. अमित शाह या हॉटेलमध्ये थांबले, तिथे मोठी कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती.