परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात तडकाफडकी मोठा निर्णय, सगळा कांड बाहेर…पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये!

परतवाडा मुलींचे शोषण प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. एसआयटीमध्ये एकूण 11 अधिकारी आणि 40 कर्मचारी असतील. यात 2 महिला अधिकारी, एक सायबर अधिकारी आणि दुसरे क्राईम अधिकारी असतील, तशी माहिती विशाल आनंद यांनी दिली आहे.

परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात तडकाफडकी मोठा निर्णय, सगळा कांड बाहेर...पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये!
amravati paratwada
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 15, 2026 | 7:17 PM

Amravati Paratwada : अमरावतीच्या परतवाडा येथील मुलींचे लैंगिक शोषण प्रकरण राज्यभरात चर्चेत आहे. या प्रकरणात आरोपीने मुलींचे व्हिडीओ व्हायरल केल्याचे बोले जात असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपींना कठोर शिक्षा दिली जावी, अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच अमरावतीचे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. या प्रकरणाची तपासणी विशेष तपास पथकाकडून केली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता परतवाडा प्रकरणात गंभीर आणि धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.

11 अधिकारी, 40 कर्मचारी करणार तपास

परतवाडा मुलींचे शोषण प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. एसआयटीमध्ये एकूण 11 अधिकारी आणि 40 कर्मचारी असतील. यात 2 महिला अधिकारी, एक सायबर अधिकारी आणि दुसरे क्राईम अधिकारी असतील, तशी माहिती विशाल आनंद यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास अत्यंत जलद गतीने केला जाईल. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आम्ही आणखी दोन आरोपींना अटक करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.

सर्वांना शांतता व संयम राखा

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आतापर्यंत आरोपीकडून पाच मोबाईल फोन जप्त केले आहेत. लैंगिक अत्याचाराचं घटनास्थळ अमरावती शहर आहे. हे संपूर्ण प्रकरण अतिशय गंभीर आहे. सर्व नागरिकांनी शांतता व संयम राखावा. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले आहे.

काँग्रेस आक्रमक, मोक्का कलम लावण्याची मागणी

दुसरीकडे अमरावतीच्या पीडित मुलींना न्याय मिळण्यासाठी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या आहेत. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मोठे पाऊल उचलले आहे. त्या उद्या दिल्लीला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची भेट घेणार आहेत. काँग्रेसनेही या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. अचलपूर (परतवाडा) येथे तरुणींचे लैंगिक शोषण करून आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. याबाबत काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज अचलपूर पोलीस प्रशासनाला जाब विचारला. आमच्या माता-भगिनींची, लेकींची सुरक्षा करण्यात असफल ठरलेल्या पोलीस प्रशासनाने किमान यापुढे तरी सदर प्रकरणाची कसून चौकशी करावी, या प्रकरणातील सर्व दोषींवर मोक्कासह कठोर कलम लावावीत, अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

Follow Us