AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलींचे व्हिडीओ काढून ते विकायचे, ड्रग्स…परतवाडा प्रकरणात अनिल बोंडेंच्या दाव्याने खळबळ!

मिळालेल्या माहितीनुसार परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी पोलीस अधीक्षक यांच्याकडून 11 पोलीस अधिकारी व 36 अंमलदारांचे विशेष तपास पथक (S.I.T.) स्थापन करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार हे या तपास पथकाचे प्रमुख असतील.

मुलींचे व्हिडीओ काढून ते विकायचे, ड्रग्स...परतवाडा प्रकरणात अनिल बोंडेंच्या दाव्याने खळबळ!
amravati paratwada viral video caseImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 15, 2026 | 4:43 PM
Share

Amravati Paratwada : अमरावती जिल्ह्यातील मुलींच्या कथित लैंगिक शोषणाच्या प्रकरणात आता नवनवीन दावे प्रतिदाव केले जात आहेत. हा मुद्दा भाजपाचे नेते तथा खासदार अनिल बोंडे यांनी लावून धरला असून या प्रकरणात ड्रग्स रॅकेट, पैशांसाठी व्हिडीओंना पॉर्नोग्राफी म्हणून विकण्यात आले, असाही दावा त्यांनी केला. दुसरीकडे परतवाड्याच्या प्रकरणात दिरंगाई केल्याचा आरोप करत ठाणेदार सुरेश मस्के, कर्मचारी अब्दुल याना निलंबित करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार, याकडे समस्त महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

एसआयटीची स्थापना, सखोल चौकशी होणार

मिळालेल्या माहितीनुसार परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी पोलीस अधीक्षक यांच्याकडून 11 पोलीस अधिकारी व 36 अंमलदारांचे विशेष तपास पथक (S.I.T.) स्थापन करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार हे या तपास पथकाचे प्रमुख असतील. त्यामुळे आता या प्रकरणात अन्य बाबीही समोर येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस उपमहानिरीक्षकांची भेट घेतली आहे. ठाणेदार मस्के यांच्याकडे एका मुलीच्या पालकाने अडीच महिन्यापूर्वी तक्रार केली होती. परंतु खुपिया अब्दुल आणि ठाणेदार मस्के यांमनी कॉम्प्रमाईज केलं. त्यामुळे या दोघांना निलंबित करावं अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा

बोंडे यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने अमरावती रेंजचे पोलीस उप महानिरीक्षक रामनाथ पोकळे, आयुक्त राकेश ओला यांची भेट घेतली. दरम्यान अनिल बोंडे यांनी विविध मागण्या उपस्थित केल्या. संवेदनशीलतेने काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित केल्याशिवाय इतर लोक जागृत होणार नाहीत. परतवाड्याचं प्रकरण एसपीच्या मर्यादेत राहिलेलं नाही. यात अनेक आरोपींचा समावेश आहे. अमरावती आणि नागपूर वरून हे प्रकरण हँडल केलं जातं होतं. अमरावती, परतवाडा या दोन शहरांमध्ये असलेल्या कोचिंग क्लासेसमध्ये या मुलांचा सहभाग होता, असा धक्कादायक आरोप ही अनिल बोंडे यांनी केला आहे.

अ़डीच महिन्यापूर्वी अयाजला अटक केले होते, पण…

कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन मुलींचा संपर्क क्रमांक मिळवला जाई. ड्रग्स रॅकेट, पॉर्नोग्राफी व्हिडिओच्या माध्यमातून या व्हिडिओंची विक्री केली जात होती. त्या पैशाच्या जोरावर हे मुलं काम करत होते. यांना या संदर्भातील प्रशिक्षण देण्याचे काम अनेक वर्षापासून केलं जातं होतं. यातील मुख्य आरोप आयज याला अडीच महिन्यापूर्वी राजापेठ पोलीस ठाण्यात पकडण्यात आलं होतं, असाही दावा बोंडे यांनी केला.आयज याला पोलिसांनी पकडले होते. परंतु ताकीद देऊन त्याला सोडून देण्यात आलं. आरोपीच्या घरावर शासनाने बुलडोझर चालवून चांगलं काम केलं, अशीही भावना बोंडे यांनी व्यक्त केली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...