AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bulldozer Action: आरोपीच्या घरावर थेट बुलडोजर ॲक्शन! परतवाडा लैंगिक अत्याचारप्रकरणातील मोहम्मद अय्याजच्या घराचे अतिक्रमण पाडणार?

Amravati Paratwada Molestation Case: अमरावती जिल्ह्यातील परतवाडवा येथील लैंगिक अत्याचारप्रकरणतील मुख्य आरोपी मोहम्मद अय्याजच्या घराचे अतिक्रमण पाडले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. काय आहे या घडीची मोठी अपडेट?

Bulldozer Action: आरोपीच्या घरावर थेट बुलडोजर ॲक्शन! परतवाडा लैंगिक अत्याचारप्रकरणातील मोहम्मद अय्याजच्या घराचे अतिक्रमण पाडणार?
आरोपीच्या घरावर थेट बुलडोजर ॲक्शनImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Apr 15, 2026 | 11:30 AM
Share

Amravati Paratwada Molestation Case: अमरावतीच्या परतवाडा मधील मुलींचे लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणात आता आरोपीच्या घरावर थेट बुलडोजर ॲक्शन होणार आहे. आज याप्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरच्या घराचे अतिक्रमण अचलपूर नगरपरिषद बुलडोझरने पाडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आरोपीच्या घराजवळ ही पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या वतीने आरोपीच्या परिवाराला अतिक्रमण संदर्भात नोटीस दिल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.मुख्य आरोपीने घराचा काही भाग अतिक्रमण करून बांधल्याचा नगरपरिषदला संशय आहे.

आतापर्यंत चार आरोपींना अटक

अमरावतीच्या परतवाडा शहरामध्ये अनेक मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. परतवाडा पोलिसांनी आणखी दोन आरोपींना रात्री अटक केल्याने एकूण आरोपींची संख्या चारवर पोहचली आहे. मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर,उजेर खान इकबाल खान,तरबेज खान तस्लिम खान.आणि मोहम्मद साद मोहम्मद सादिक अशा चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी उजेर खान याने त्यांच्या कडे असलेले अश्लील व्हिडिओ हे मोहम्मद साद मोहम्मद सादिक याला पाठवल्याची कबुली दिली आहे. दरम्यान इतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

तर नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी एक आरोपी मध्ये वाढ झाली आहे. हुजेर खान इकबाल खान वय 20 वर्षे असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात आतापर्यंत 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांकडे मिळाले आहे. या प्रकरणात फिर्यादी संख्या वाढ होणार असल्याने आरोपी आणि गुन्ह्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. फिर्यादींनी समोर येऊन पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. फिर्यादीची माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली आहे.

आज अचलपूर आणि परतवाडा बंदची हाक

अमरावतीच्या परतवाडा शहरामध्ये अनेक तरुणींचा लैंगिक शोषण करून असलेले व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणात आज अचलपूर आणि परतवाडा शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तर दुसरीकडे अचलपूर-परतवाडा शहरांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. ठिकठिकाणी पोलीस आणि दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. चौका चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. घटनेचा निषेध करत असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे.

कोणाचाचं धाक राहिला नाही

दरम्यान यासर्व घडामोडीवर काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे शॉकीग आहे. आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये नाशिक सारखं प्रकरण बाहेर आले आहे. कोणाचाचं धाक राहिला नाही. नाशिकचे प्रकरणामध्ये आपण पाहिलं त्याची अशोक खरात याची बायको गायब झाली मुलगा खराबचा गायब होतो पोलिसांना दिसत नाही. अशा गोष्टी आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात घडते आहे या संपूर्ण गोष्टीचा निषेध आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

आरोपीला जन्मठेपेची शिक्षा द्या

तर याप्रकरणात युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार रवी राणा यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. हिंदू मुलींची फसवणूक करून त्याचे व्हिडिओ काढले त्याचा मी जाहीर निषेध करतो, त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली. पोलीसांनी त्याची चांगली धुलाई केली पाहिजे, कारण त्याने लव्ह जिहाद ला पाठबळ दिलं आहे. वेळ आली तर त्याच्या त्याला आमच्या ताब्यात दिलं पाहिजे. आजच्या अचलपूर- परतवाडा बंद ला आमचा पाठिंबा आहे. त्याला पोलीसांनी चांगला धडा शिकवला पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

आरोपीला फाशीची शिक्षा द्या

तर या प्रकरणात काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखडे यांची संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे. मुख्य आरोपी अयान अहमद तनवीर अहमद फाशीची शिक्षा किंवा त्याला उकळत्या तेलात टाकलं पाहिजे अशी खळबळजनक प्रतिक्रिया खासदार बळवंत वानखडे यांनी दिली. हे अतिशय गंभीर बाब याचा कोणी समर्थन करणार नाही या नराधमावर कठोरातील कठोर कारवाई होऊन त्याला फाशीची शिक्षा द्या असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

तर याप्रकरणी भाजपा नेते राज्यसभा खासदार अनिल बोंडे दुपारी 1 वाजता विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांची भेट घेणार आहेत. परतवाडा प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परतवाडा प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. काल रात्री जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना मुख्यमंत्र्यांनी फोन केला आणि घटनेची माहिती घेतल्याचे समजते.

Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा