राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांना मोठे आदेश, सुनेत्रा पवार यांच्या थेट सूचना, थेट दिवाळीनंतर..

राष्ट्रवादीची बैठक नुकताच पार पडली. या बैठकीत काही निर्णय झाली. राष्ट्रवादीमध्ये सर्वकाही अलबेल नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्यातच आता महत्वाची बैठक पार पडली.

राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांना मोठे आदेश, सुनेत्रा पवार यांच्या थेट सूचना, थेट दिवाळीनंतर..
NCP leaders meeting
| Updated on: Nov 04, 2026 | 7:20 AM

राष्ट्रवादीमधील नेत्यांची खदखद पुढे आल्याचे बघायला मिळाले. पार्थ पवार विश्वासात घेत नसल्याचे अनेक वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. काही निवडी पार्थ पवार यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता केल्या. यासोबतच राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेत्यांनी थेट अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यातच सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत दोन ते चार सदस्य हे राजाच्या बाहेरील होती. बाकी सर्व विधानसभा सदस्य विधान परिषद सदस्य उपस्थित होते.  राजेंद्र जैन, पार्थ पवार, प्रफुल पटेल देखील उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून अर्थखात्यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. अजित पवारांच्या निधनानंतर हे खाते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे ठेवले. राष्ट्रवादीच्या म्हणण्यानुसार, अर्थखाते राष्ट्रवादीकडे आलेले आहे.

या बैठकीत काही सूचना देण्यात आल्यात. महाराष्ट्रातील दुष्काळादरम्यान राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्र्यांनी दौरे सुरू करावे.  जिल्ह्यात मतदारसंघात तालुकामध्ये चार पाच ठिकाणी भेटी द्याव्यात. नुकसानाची पाहणी करत असताना राज्य सरकारने जी काही मदत केलेली आहे. त्या संदर्भात पंचनामे त्याची माहिती घेणे त्याचा आढावा घेणे आवश्यकता वाटल्यास त्या तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे असा सर्व अजेंडा नेमलेला आहे.

Loading...

उपमुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे दौरे सुरू होतील आमदारांनी देखील त्यांच्या विभागामध्ये दौरे करावेत, अशा सूचना करण्यात आल्या. विधान परिषदेचे सदस्य आहेत, त्यांना देखील काही जिल्ह्यांची जबाबदारी देणार आहे ते त्यांच्या शेतकऱ्यांच्या बांधावरती जातील आणि प्रश्न समजून घेतील आणि आढावा घेतील.

या बैठकीत रोहित पवार यांच्याबद्दलही चर्चा झाली. आमदार शेवटी लोकांच्या मधून निवडून येत असतात त्यावेळी लोकांचा समोर काम आराखडा ठेवलेला असतो. आता ते केलं निधी मिळण्याचा दृष्टीतून आमदारां. नी आपल्या मागण्या मांडल्या. सरकारमध्ये काम करत असताना विकासासाठी निधी मिळावा अशी मागणी असते. आमदारांना पुढच्या काळामध्ये निधी कशा मिळेल या संदर्भात आम्ही काम करू.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us