AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भेंडवळच्या पावसाबाबतच्या भविष्यवाणीला थेट चॅलेंज, अंदाज अचूक ठरल्यास 80 लाखांचे बक्षीस, कुणी केली घोषणा?

Bhendwal Prediction : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी मात्र भेंडवळ व ज्योतिषशास्त्राला आव्हान दिले आहे. त्यांनी भविष्यवाणीची 90% अचूकता सिद्ध केल्यास आणि 80 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

भेंडवळच्या पावसाबाबतच्या भविष्यवाणीला थेट चॅलेंज, अंदाज अचूक ठरल्यास 80 लाखांचे बक्षीस, कुणी केली घोषणा?
Shyam ManavImage Credit source: Google
| Updated on: Apr 20, 2026 | 4:01 PM
Share

बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडली. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी आज सूर्योदयाच्या वेळी या मांडणीचे निष्कर्ष जाहीर केले. यात पाऊस किती पडणार? राजकीय परिस्थिती काय असेल? शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणार का? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे समोर आली आहेत. घटमांडणीच्या भाकितानुसार पावसाची स्थिती चढ-उताराची राहणार असल्याचे समोर आले आहे. अशातच आता अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी मात्र भेंडवळ व ज्योतिषशास्त्राला आव्हान दिले आहे. त्यांनी या भविष्यवाणीची 90% अचूकता सिद्ध करा आणि 80 लाखांचे बक्षीस घेऊन जा असं म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

किती पाऊस पडणार?

यंदाच्या भेंडवळच्या घटमांडणीच्या भाकितानुसार पावसाचा पहिला महिना अत्यंत कमी पावसाचा असेल. यामुळे सुरुवातीच्या पेरण्यांना विलंब होऊ शकतो किंवा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. दुसऱ्या महिन्यात पाऊस साधारण स्वरूपाचा राहील, ज्यामुळे पिकांना उभारी मिळेल. तिसरा महिना घातक ठरु शकतो. या महिन्यात जलप्रलय होण्याची शक्यता आहे.यानंतर चौथ्या महिन्यातही पाऊस चांगला पडेस अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे.

भेंडवळच्या भविष्यवाणीला चॅलेंज

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी भेंडवळ, कुंडली व पारंपरिक ज्योतिषशास्त्राच्या अचूकतेवर प्रश्न उपस्थित करत खुले आव्हान दिले आहे. मानव यांनी, ’10 कुंडल्या आणि सध्याची माहिती देऊ, त्यापैकी 90 टक्क्यांपेक्षा जास्त भविष्यवाणी अचूक ठरवून दाखवा, ते सिद्ध झाल्यास तब्बल 80 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

लोकांना फसवण्यासाठी श्रद्धेचा वापर होतो – मानव

श्याम मानव यांनी पुढे बोलताना म्हटले की, आजच्या काळात हवामान अंदाजासारख्या गोष्टी विज्ञान व अभ्यासावर आधारित असून त्या पडताळून पाहता येतात. मात्र भेंडवळ किंवा ज्योतिषाच्या दाव्यांना तितकी शास्त्रीय पडताळणी नाही. पूर्वी शेतकरी अनुभवावर निर्णय घेत होते, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे परिस्थिती बदलली आहे. यावेळी काही धार्मिक व पारंपरिक प्रथांवरही त्यांनी टीका केली. ‘लोकांना फसवण्यासाठी श्रद्धेचा वापर होतो’ असा आरोप करत अशा प्रथांविरोधात जागृतीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सामाजिक व धार्मिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...