AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पुण्यात दहशतवादी विरोधी पथकाची छापेमारी, एका व्यक्तीची कसून तपासणी

ATS Raid in Pune: दिल्ली बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. महत्त्वाच्या शहरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अशातच आता पुण्यातील कोंढवा भागात दहशतवाद विरोधी पथकाने छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! पुण्यात दहशतवादी विरोधी पथकाची छापेमारी, एका व्यक्तीची कसून तपासणी
Pune Ats Raid
| Updated on: Nov 12, 2025 | 4:59 PM
Share

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. महत्त्वाच्या शहरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अशातच आता पुण्यातील कोंढवा भागात दहशतवाद विरोधी पथकाने छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाकडून पुण्यातील एका व्यक्तीची कसून चौकशी करण्यात येत आहे. दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

भागात दहशतवादी विरोधी पथकाची पुण्यात छापेमारी

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा भागात दहशतवादी विरोधी पथकाने छापेमारी केल आहे. यावेळी एका व्यक्तीची कसून तपासणी करण्यात येत आहे. या व्यक्तीला अद्याप ताब्यात घेतलेले नाही, मात्र त्याच्या घराची झडती घेण्यात आली आहे. या कारवाईत लॅपटॉप, हार्डडिस्क आणि काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त करण्यात आले आहेत अशा माहितीही समोर आली आहे.

दहशतवादी जुबेर हंगरगेकरच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून कारवाई

दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात आली आहे. संशयित व्यक्तीकडून जप्त करण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यानंतर या व्यक्तीचा नेमका कुठल्या व्यक्तीशी आहे हे समोर येणार आहे.

मुंब्रा येथेही दहशतवादी पथकाचा छापा

याआधी दहशतवादी विरोधी पथकाने मुंब्रा येथील कौसा विभागामध्ये राहणाऱ्या एका शिक्षकाच्या घरी धाड टाकली होती. या कारवाईत अधिकाऱ्यांनी त्याच्या घरातले मोबाईल आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत. सदरचा शिक्षक हा जमात ये इस्लाम या संघटनेशी संबंधित असल्याचे समोर आले आहे, मात्र या व्यक्तीचे नाव काय आहे ह अद्याप समोर आलेले नाही. पोलीस आणि तपास अधिकारी या सर्व प्रकरणांचा तपास करत आहेत.

दरम्यान, दिल्लीतील स्फोटानंतर व्हाईट कॉलर मॉड्यूल संपूर्ण देशात सक्रीय करण्याची तयारी होती अशी माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना अलर्ट जारी करण्यात आला होता. देशातील संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अशातच आता पुण्यातील छापेमारीने खळबळ उडाली आहे.

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला