AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कारगिल युद्धात अख्खा देश जवानांसोबत होता, आता आम्ही सर्व जवान आशा वर्कर्ससोबत’

कोल्हापूर जिल्ह्यातील गिरगावमध्ये लष्करातील जवान शशिकांत साळोखे यांनी आशा वर्कर्सचा सत्कार करुन, (Asha workers felicitated by jawan) कृतज्ञता व्यक्त केली

'कारगिल युद्धात अख्खा देश जवानांसोबत होता, आता आम्ही सर्व जवान आशा वर्कर्ससोबत'
| Updated on: Apr 13, 2020 | 1:02 PM
Share

कोल्हापूर : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आशा वर्कर्स सध्या (Asha workers felicitated by jawan) फ्रंटफूटवर काम करत आहेत. गावोगावी प्रत्येक घरात जाऊन या आशा वर्कर्स तपासणी करत आहेत. या आशा वर्कर्सच्या कार्याला जवानांनी सलाम केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गिरगावमध्ये लष्करातील जवान शशिकांत साळोखे यांनी आशा वर्कर्सचा सत्कार करुन, कृतज्ञता व्यक्त केलीच, शिवाय सर्व जवान तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली. (Asha workers felicitated by jawan)

कोरोनाच्या लढ्यात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेवीका आणि आरोग्यसेविकांचा सन्मान गिरगाव येथील जवान शशिकांत साळोखे यांनी केला. आशा आणि आरोग्यसेविका जीव धोक्यात घालून प्रत्येक गावात काम करत आहेत. गाव पातळीवरील माहिती जिल्हा पातळीवर देत हा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे.

गावात येणाऱ्या प्रत्येक माणसाची इत्यंभूत माहिती संकलित करणे, होम क्वारंटाईन असलेल्या लोकांशी संपर्क ठेवत त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे, अशी जोखमीची कामे सुरू आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत गिरगाव येथील जवान शशिकांत साळोखे यांनी त्यांचा या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

ज्यावेळी कारगिलमध्ये लढाई झाली होती, त्यावेळी अख्खा देश जवानांच्या मागे उभा होता. सैनिक आतासुद्धा बॉर्डरवर राहून संरक्षण करत आहे. मात्र आता देश कोरोना संकटात असताना, या संकटातून बाहेर काढण्यासाठी आशावर्कर्स लढत आहेत, त्यांच्या कार्याला सलाम करुन, त्यांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी त्यांचा सत्कार केला, असं शशिकांत साळोखे यांनी सांगितलं.

Follow Us
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक.
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती.
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती.
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!.
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?.
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?.
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.