वाघ असाल तर चित्राताईंसारखे व्हा, शेळ्या-मेंढ्यांसारखे नको, भाजपने शिवसेनेला डिवचलं

| Updated on: Feb 25, 2021 | 5:51 PM

वाघ असाल तर चित्राताईंसारखे व्हा, शेळ्या-मेंढ्यांसारखे नको," अशा शब्दांत भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेला डिवचलं. (ashish shelar shiv sena sanjay rathore pooja chavan)

वाघ असाल तर चित्राताईंसारखे व्हा, शेळ्या-मेंढ्यांसारखे नको, भाजपने शिवसेनेला डिवचलं
आशिष शेलार
Follow us on

मुंबई : “महाराष्ट्रातील आई, बहिणींची अब्रू आणि सुरक्षा राखायची असेल तर खरंच वाघासारखे वागा. वाघ असाल तर चित्राताईंसारखे व्हा, शेळ्या-मेंढ्यांसारखे नको,” अशा शब्दांत भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेला डिवचलं. सध्या पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांचे नाव घेतले जात आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, अद्याप तसा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी वरील वक्तव्य केले. ते मुंबईत ‘टीव्ही 9 मरठी’शी बोलत होते. (Ashish Shelar criticizes Shiv sena on Sanjay Rathore and Pooja Chavan suicide case)

“स्वतःला वाघ आणि आम्हीच वाघाची डरकाळी काढू म्हणणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम चित्राताई वाघ यांनी केले. खरे वाघ असाल तर चित्राताई वाघ यांच्यासारखे वागा. शेळ्या-मेंढ्यांसारखे वागू नका. महाराष्ट्रातील आई, बहीण यांची अब्रू आणि सुरक्षा राखायची असेल तर खरंच वाघासारखे वागा,” असे शेलार म्हणाले.

चित्रा वाघ यांचा हंगामा 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली आहे. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यामुळे भाजपने हा मुद्दा लावून धरलेला आहे. भाजपकडून राठोड यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, अद्याप तसा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्य सरकार तसेच शिवसेनेच्या भूमिकेवर तसेच पोलिसांच्या तपासावरुसुद्धा भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत. हाच मद्दा घेऊन आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुण्यातील वानवाडी पोलीस ठाण्यात हंगामा केला. त्यांनी पोलिसांना थेट जाब विचारत पोलीस पूजा चव्हाण प्रकरणात हलगर्जीपणा करत असल्याचा त्यांनी आरोप केला. याच प्रकाराचा आधार घेत आशिष शेलार यांनी शिवसेनेला डिवचलं.

मंत्र्याला पाठिशी घालण्याचा प्रयत्न

यावेळी बोलताना त्यांनी संजय राठोड यांनी पोहरादेवीचे दर्शन घेताना केलेल्या शक्तिप्रदर्शनावरसुद्धा थेट टीका केली. “पोहरादेवीच्या प्रांगणात गर्दी रोखण्यात पोलीस प्रशासन सपशेल अपयशी ठरले. या कार्यक्रमाचे आयोजन कुणी केलं होतं, हे सर्वांना माहिती आहे. या मंत्र्याला पाठिशी घालण्याचं काम सुरु आहे,” असे शेलार म्हणाले. तसेच, या मंत्र्यावर गुन्हा दाखल का केलेला नाही, असा सवालही त्यांनी केला.

इतर बातम्या :

अवघ्या 5 महिन्यात Rapido ऑटोच्या 10 लाख राईड्स, ‘या’ शहरात सर्वाधिक मागणी

LPG Cylinder Price: गृहिणींचं बजेट कोलमडणार; गॅस सिलिंडरच्या किमतीत एका महिन्यात तिसऱ्यांदा वाढ; पटापट तपासा

फेरीवाल्यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक, कोरोना रिपोर्ट दाखवल्याशिवाय व्यवसाय करता येणार नाही, वर्ध्यात प्रशासनाची अट

(Ashish Shelar criticizes Shiv sena on Sanjay Rathore and Pooja Chavan suicide case)