AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PI लगड एक नंबरचा रगेल, त्याला चालवणारा बाप कोण ते शोधून काढू, चित्रा वाघ घसरल्या

वानवडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक लगट यांना हे प्रकरण रफादफा करण्यासाठीच बसवले आहे. मी त्यांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी अत्यंत मग्रुरीने उत्तरे दिली. | chitra wagh pooja chavan suicide case

PI लगड एक नंबरचा रगेल, त्याला चालवणारा बाप कोण ते शोधून काढू, चित्रा वाघ घसरल्या
Chitra Wagh Morph Photo
| Updated on: Feb 25, 2021 | 12:04 PM
Share

पुणे: वानवडी पोलिसांना पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण रफादफा करायेच आहे. त्यासाठीच हे प्रकरण PI लगड याच्यासारख्या रगेल अधिकाऱ्याकडे देण्यात आले आहे. मात्र, या PI लगडचा बाप कोण आहे, ते आम्ही शोधून काढू, अशा शब्दांत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पुणे पोलिसांनी लक्ष्य केले. (bjp leader chitra wagh slams pune police)

त्या गुरुवारी वानवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. आम्ही इतक्या दिवसांपासून मुंबईतून पूजा चव्हाण प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. मात्र, आज प्रत्यक्ष घटनास्थळी आल्यानंतर तपासाची परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून आले. वानवडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक लगट यांना हे प्रकरण रफादफा करण्यासाठीच बसवले आहे. मी त्यांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी अत्यंत मग्रुरीने उत्तरे दिली. आपला कोणीतरी बाप वरती बसलाय, कोणी काही बोलले नाही तरी तू काही करायचे नाही, आम्ही काय ते बघतो, अशा एकंदर आविर्भावात PI लगड दिसतात. या लगडला चालवणारा बाप कोण आहे, हे भाजप नक्की शोधून काढेल, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.

पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार

पूजा चव्हाणचा मृत्यू झाला त्या ठिकाणाची माहिती घेतली. भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी मदत केली. राठोडांच्या राजीनाम्याबद्दल विचारले असता मी थोड्याच वेळाय याबद्दल बोलणार आहे, असं वाघ म्हणाल्या. चित्रा वाघ यांनी इमारतीची पाहणी करण्यापूर्वी पूजा चव्हाणच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली. चित्रा वाघ आज दुपारी 1 वाजता पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत.

वानवडीत जाऊन चित्रा वाघ म्हणाल्या, पुणे पोलीस दलाल, PI लगड यांच्याशी बाचाबाची

भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीला भेट देत पाहणी केली. यावेळी वाघ म्हणाल्या की, पूजा चव्हाण राहात होती तो फ्लॅट सील आहे. वरचे चार फ्लॅट आहेत ते बंद आहेत. आम्ही त्या फ्लॅटच्या वरच्या फ्लॅटची पाहणी केली आहे. गॅलरीतील ग्रीलची पाहणी केली आहे. ग्रीलची ऊंची पाहता पूजा चव्हाण स्वत: खाली पडली? का तिला खाली ढकलले गेले? हे प्रश्न कायम आहेत. दरम्यान, यावेळी चित्रा वाघ आणि वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. (Chitra Wagh visit building at Wanawadi Pune where Pooja Chavan suicide)

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर वाघ यांनी दीपक लगड यांच्याकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास काढून घेण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावा अशी मागणीदेखील वाघ यांनी केली आहे. दरम्यान, यावेळी वाघ यांनी पुणे पोलीस दलाल असल्याचे वक्तव्य केले आहे.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्री संवेदनशील, ते राठोड सारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रिमंडळातून हाकलून देतील, असा विश्वास : चित्रा वाघ

भाजपने आधीच सुधीर मुनगंटीवारांकडे सर्व जबाबदारी दिली असती तर…? उदय सामंतांचं मोठं विधान

(bjp leader chitra wagh slams pune police)

पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेकडे वाटचाल? दादांबरोबर युती पहिली पायरी?
पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेकडे वाटचाल? दादांबरोबर युती पहिली पायरी?.
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?.
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा.
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध.
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!.
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ...
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ....
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला.
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध.
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.