भाजपने आधीच सुधीर मुनगंटीवारांकडे सर्व जबाबदारी दिली असती तर…? उदय सामंतांचं मोठं विधान

शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत शत्रू नाही, पुढे बघू काय होतं ते, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर म्हटलं होतं. (uday samant reaction on sudhir mungantiwar visits with cm uddhav thackeray)

  • समीर भिसे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 14:25 PM, 3 Feb 2021
भाजपने आधीच सुधीर मुनगंटीवारांकडे सर्व जबाबदारी दिली असती तर...? उदय सामंतांचं मोठं विधान

मुंबई: शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत शत्रू नाही, पुढे बघू काय होतं ते, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर म्हटलं होतं. त्यावर शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. भाजपने या आधीच सर्व जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे द्यायला हवी होती. आज ही वेळ आली नसती, असं सूचक विधान उदय सामंत यांनी केलं आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या जवळकीच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. (uday samant reaction on sudhir mungantiwar visits with cm uddhav thackeray)

उदय सामंत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवार काल भेटले. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. पण काय चर्चा झाली हे माहीत नाही. सुधीरभाऊ हे माझे विधीमंडळातील ज्येष्ठ सहकारी आहेत. त्यांनी पूर्वीच पुढाकार घेतला असता तर आज ही वेळ आली नसती, असं उदय सामंत म्हणाले. मागच्या पाच वर्षात मी सुधीरभाऊंसोबत काम केलं आहे. त्यांच्याकडे या आधीच सर्व जबाबदारी दिली असती तर आज हे कटू प्रसंग उद्भवले नसते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

शरजीलवर कारवाई होईल

यावेळी त्यांनी शरजील उस्मानीवर कारवाई होणार असल्याचं सांगितलं. शरजील विरोधात एफआयआर दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावर कारवाई होईल. आघाडी सरकारने त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवलेला आहे. कुणीही त्याचं राजकारण करू नये, असं आवाहन त्यांनी केलं.

गर्दीत कुणीही येऊन फोटो काढतो

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत गुंडांनी फोटो काढल्याने त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. त्यावरही सामंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. गर्दीत कुणीही येऊन आमच्यासोबत फोटो काढतो. कुणी फोटो काढला हे आम्हाला गर्दीमुळे कळत नाही. देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांना याची माहिती असणारच. काल अनिल देशमुखांबाबतही तेच घडलं, असं सांगतानाच ती व्यक्ती जर गुन्हेगारी पार्श्वभूमीची असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल असं ठामपणे सांगितलं. (uday samant reaction on sudhir mungantiwar visits with cm uddhav thackeray)

कॉलेज सुरू करण्याची वेळ आली

शाळा सुरू झाल्यानंतर आता राज्याने कॉलेज सुरू करण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. कॉलेज सुरू करण्यासाठी एसओपी तयार करण्याचं काम सुरू आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कॉलेज सुरू करण्याची वेळ ठरवण्यात येईल. आता कॉलेज सुरू करण्याची वेळ आली आहे, असंही ते म्हणाले. (uday samant reaction on sudhir mungantiwar visits with cm uddhav thackeray)

 

संबंधित बातम्या:

शिवसेना अंतिम श्वासापर्यंत शत्रू नाही, पुढे बघू काय होतंय; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मुनगंटीवारांचे वक्तव्य

‘मोठा भाऊ पाहून कुंभकर्णानेही आत्महत्या केली असती, मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मोठी बातमी : मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांचं नाव बदलणार

(uday samant reaction on sudhir mungantiwar visits with cm uddhav thackeray)