शिवसेना अंतिम श्वासापर्यंत शत्रू नाही, पुढे बघू काय होतंय; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मुनगंटीवारांचे वक्तव्य

उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत, ते सोनिया गांधींच्या दबावाखाली येणार नाहीत. | Sudhir mungantiwar

शिवसेना अंतिम श्वासापर्यंत शत्रू नाही, पुढे बघू काय होतंय; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मुनगंटीवारांचे वक्तव्य
विशेष म्हणजे या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचक वक्तव्याने या संभ्रमात आणखीनच भर टाकली. आजच्या भेटीमुळे ज्यांना राजकीय चर्चा करायची आहे, त्यांनी ती करू द्या. शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू असणार नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 8:28 PM

मुंबई: फडणवीस-राऊत गळाभेटीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारी आणखी एक घटना समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Manguntiwar) यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर हे दोन्ही नेते भेटले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड बराच काळ चर्चा झाल्याचे सांगितले जाते. या चर्चेचा नेमका तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. (BJP leader Sudhir Manguntiwar meets CM Uddhav Thackeray)

विशेष म्हणजे या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचक वक्तव्याने या संभ्रमात आणखीनच भर टाकली. आजच्या भेटीमुळे ज्यांना राजकीय चर्चा करायची आहे, त्यांनी ती करू द्या. शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू असणार नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटले. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये नक्की शिजतंय तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

दरम्यान, या भेटीत माझ्या मतदारसंघातील विकास कामांसंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. तसेच चंद्रपूर विमानतळाबाबतही आमच्यात बोलणी झाली, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

‘आता पुढे बघू काय होतंय’

उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत, ते सोनिया गांधींच्या दबावाखाली येणार नाहीत, असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत. कधीकाळी युतीमध्ये सडलो, म्हणत युती तोडली, पण नंतर परत सोबत आले, आता पुढे बघू, असं मुनगंटीवार म्हणाल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात.

राऊत-फडणवीसांची गळाभेट नेमकी कशी झाली?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या लेकीचा साखरपुडा रविवारी पार पडला. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा साखरपुडा झाला. राऊत यांच्या घरातील हे पहिलंच मंगलकार्य आहे. या सोहळ्यात विविध राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

वेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे एकत्रच कार्यक्रमस्थळी पोहोचले. त्यावेळी मल्हार आणि पूर्वशी यांच्यासोबत नार्वेकर कुटुंबीय आणि संजय राऊत यांच्या पत्नी उपस्थित होत्या. फडणवीस आणि दरेकर यांचं आगमन झाल्यानंतर राजेश नार्वेकर यांनी फडणवीसांना नमस्कार केला. फडणवीसांनी पुढे होऊन मल्हार आणि पूर्वशी यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.

त्यावेळी दुसरीकडे असलेल्या संजय राऊत यांनी फडणवीसांना पाहिलं आणि ते फडणवीसांकडे आले. दोघेही समोरासमोर आल्यानंतर राऊत यांनी फडणवीसांची गळाभेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं. त्यानंतर नव्या जोडप्यासह नार्वेकर आणि राऊत कुटुंबियांसोबत फडणवीसांनी फोटो काढले. त्यानंतर दरेकर यांनी पुढे होत नव्या जोडप्याला पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. तेव्हा राऊतांनीही पुढे होत दरेकरांच्या हातात हात दिला.

संबंधित बातम्या:

‘ती’ काही शिवाजी महाराज आणि अफझलखानाची गळाभेट नव्हती: संजय राऊत

संजय राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्यात फडणवीस-राऊत गळाभेट! अनेकांच्या भुवया उंचावल्या

(BJP leader Sudhir Manguntiwar meets CM Uddhav Thackeray)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.