AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री संवेदनशील, ते राठोड सारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रिमंडळातून हाकलून देतील, असा विश्वास : चित्रा वाघ

"मंत्रिमंडळातल्या बाकी मंत्र्यांचं सोडून द्या, पण मुख्यमंत्र्यांची छवी ही चांगली आहे", असं चित्रा वाघ म्हणाल्या (Chitra Wagh reaction on Minister Sanjay Rathore meet CM Uddhav Thackeray).

मुख्यमंत्री संवेदनशील, ते राठोड सारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रिमंडळातून हाकलून देतील, असा विश्वास : चित्रा वाघ
Chitra Wagh_Sanjay Rathod
| Updated on: Feb 24, 2021 | 7:57 PM
Share

मुंबई : “मला आताही विश्वास आहे, मुख्यमंत्री पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात लक्ष घालतील. त्यांना ही संपूर्ण घटना माहिती आहे. ते वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतील. मुख्यमंत्री राठोड यांच्यासारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रीमंडळातून हाकलून देतील, असा अजूनपर्यंत विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित करताना दिली. यावेळी चित्रा वाघ राठोड यांच्या राजीनाम्यासाठी जास्त आक्रमक बघायला मिळाल्या (Chitra Wagh reaction on Minister Sanjay Rathore meet CM Uddhav Thackeray).

चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या?

“मंत्रिमंडळातल्या बाकी मंत्र्यांचं सोडून द्या, पण मुख्यमंत्र्यांची छवी ही चांगली आहे. महाराष्ट्राची जनता त्यांच्याकडे अतिशय संवदेनशील व्यक्तीमत्व म्हणून बघते. त्यामुळे ते राठोडांबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष आहे”, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं (Chitra Wagh reaction on Minister Sanjay Rathore meet CM Uddhav Thackeray).

“शिवाजी महाराजांनी महिलेवर अत्याचार केलेल्या पाटलाचे हातपाय तोडले होते. त्याचबरोबर महाराजांनी सुभेदाराच्या सूनेची मानसन्मानाने पाठवण केली होती. मुख्यमंत्री महोदयांनी या दोन घटना डोळ्यांसमोर आणाव्यात. म्हणजे या संजय राठोड सारख्या नराधम्याचा राजीनामा घेणं तुम्हाला नक्कीच सुलभ होईल”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

‘मुख्यमंत्र्यांनी अशा लोकांना माफी देऊ नये’

“संजय राठोड या माणसाबद्दल बोलून आपण आपलं तोंड खराब कशाला करुन घ्यायचं? इतका संतापजनक हा प्रकार आहे. एक बलात्कारी, हत्यारी माणूस लाखोंची गर्दी जमा करतो आणि मी निर्दोष आहे, असं म्हणतो. आज कॅबिनेटच्या बैठकीत जातो. काय चाललंय? मुख्यमंत्र्यांनी अशा लोकांना माफी देऊ नये. त्याची हकालपट्टी करावी. मंत्रिमंडळातील कोणत्याही नेत्याकडून हे अपेक्षित नाही”, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला.

‘मुख्यमंत्री अतिशय चांगले आणि संवेदनशील’

“मुख्यमंत्री हे अतिशय चांगले, संवेदनशील आहेत. त्यांच्याकडे बघण्याची आमची भूमिका ही वेगळी आहे. जनता त्यांच्याकडे फार चांगल्या नजरेने बघते. मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत, ते बाकीच्या इतर मंत्र्यांसारखे नाहीत. म्हणून मुख्यमंत्री या माणसाला हाकलून देतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे”, असं मत त्यांनी मांडलं.

‘बलात्कारांना वाचवण्यासाठी सत्ताधारी पक्षांच्या मंत्र्यांमध्ये चढाओढ’

“बलात्कारांना वाचवण्यासाठी सत्ताधारी तीनही पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांमध्ये चढाओढ चालली आहे. त्यांची ही एकी बाकीच्या ठिकाणी दिसली नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे भंडाऱ्यात अकरा मुलं होरपळून मेली. याप्रकरणी 40 दिवस कोणताही एफआरआय दाखल झाला नाही. या प्रकरणात कोणत्याही मंत्र्यांची एकी आली नाही. पण बलात्कारी मंत्र्यांना पाठीशी घालण्यासाठी सर्व नेते एकत्र आले हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

‘हत्याराला पहिल्यांदा हाकलून द्यावं’

“राज्याच्या मंत्रिमंडळातील एकाही नेत्याकडून मला अपेक्षा नाही. इकडून-तिकडून सगळे सारखे आहेत. आता अपेक्षा फक्त मुख्यमंत्र्यांकडे आहे. मुख्यमंत्र्यांनी या हत्याराला पहिल्यांदा हाकलून द्यावं. मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, हा आमचा विश्वास आहे”, असंदेखील त्या म्हणाल्या.

“आज हा विषय फक्त पूजा चव्हाण आणि संजय राठोड पुरता मर्यादित नाही. आज जर आपण गप्प राहिलो तर भविष्यामध्ये कुठलीही महिला, मुलगी स्वत:चा न्याय मागण्यासाठी पुढे येणार नाही. कारण हे असे धनदांडगे पैशांचा वापर करुन स्वत: शेण खायचं आणि सर्व समाजाला रस्त्यावर उतरायला लावतात. हाच ट्रेंड महाराष्ट्रामध्ये चालू झालाय. त्याचा परिणाम आपल्या पोरी-बाळींच्या आयुष्यावर होऊ शकतो. त्यासाठी आमची ही लढाई पूर्णपणे चालू राहील, जोपर्यंत न्याय मिळत नाही”, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

एकदा नेत्याला भेटलं की कवच कुंडल भेटतात, मग कायदाही काही करु शकत नाही : सुधीर मुनगंटीवार

भाजपने आधीच सुधीर मुनगंटीवारांकडे सर्व जबाबदारी दिली असती तर…? उदय सामंतांचं मोठं विधान

कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन.
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.