आधी वाजपेयींच्या श्रद्धांजलीला विरोध, आता बलात्काराचा गुन्हा, नगरसेवक सय्यद मतीन अडचणीत

पिंपरी चिंचवड : औरंगाबादचे एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांच्याविरोधात चाकण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप सय्यद मतीन यांच्यावर आहे. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे.  सय्यद मतीन यांच्यासोबत त्यांचा मेहुणा हमीद सिद्दीकी आणि बानी रशीद सय्यद यांच्यावरही विनयभंग आणि महिलेला गुंगीचे …

Aurangabad Corporator Matin Sayyed booked for raping woman in chakan, आधी वाजपेयींच्या श्रद्धांजलीला विरोध, आता बलात्काराचा गुन्हा, नगरसेवक सय्यद मतीन अडचणीत

पिंपरी चिंचवड : औरंगाबादचे एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांच्याविरोधात चाकण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप सय्यद मतीन यांच्यावर आहे. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे.  सय्यद मतीन यांच्यासोबत त्यांचा मेहुणा हमीद सिद्दीकी आणि बानी रशीद सय्यद यांच्यावरही विनयभंग आणि महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप आहे.

सय्यद मतीन यांची एमआयएमने हकालपट्टी केली आहे. सय्यद मतीन यांनीच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या निधनांतर औरंगाबाद महापालिकेत श्रद्धांजली ठरावास विरोध केला होता.

दरम्यान, सय्यद मतीन यांच्यावर आरोप करणारी महिला चाकणमध्ये राहते. आरोपी नगरसेवक सय्यद मतीनने संबंधित महिलेला तिच्या राहत्या घरातून नेऊन, तिच्यावर विविध ठिकाणी बलात्कार केल्याचा आरोप आहे.

ही घटना 26 नोव्हेंबर 2018 ते 24 फेब्रुवारी 2019 खंडाळा येथील वॉटर पार्क,कृष्णसागर रेसिडेन्सी बारामती, टाऊन हॉल औरंगाबाद,औरंगाबादमधील शरणापूर फाट्याजवळ गिरीजा लॉज आणि औरंगाबाद येथील एका घरात या तीन आरोपींनी गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याचा आरोप आहे. या तिन्ही आरोपींविरुद्ध पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चाकण पोलीस ठाण्यात बलात्कार आणि विनयभंग यांचा गुन्हा दाखल झाला आहे.

कोण आहे सय्यद मतीन?

सय्यद मतीन हे औरंगाबादमधील चर्चेत नाव आहे. सय्यद मतीन हे औरंगाबाद महापालिकेत MIM च्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र काही महिन्यांनी एमआयएमने त्यांची हकालपट्टी केली.

सय्यद मतीन हे नाव त्यावेळी चर्चेत आलं, जेव्हा त्यांनी औरंगाबाद मनपात अटल बिहारी वाजपेयींच्या श्रद्धांजलीच्या ठरावाला विरोध केला होता. त्यावेळी शिवसेना भाजप नगरसेवकांनी त्यांना बेदम मारहाण केली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *