अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी तहसीलदारांना मिळणार बंदूकधारी सुरक्षा रक्षक, औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

| Updated on: Jun 26, 2021 | 8:40 AM

औरंगाबादच्या जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता अवैध वाळू उपसा-वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदारांना बंदूकधारी सुरक्षा रक्षक मिळणार आहे. (Arm Security Guard protect revenue officer Aurangabad Collector Sunil Chavan Decision)

अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी तहसीलदारांना मिळणार बंदूकधारी सुरक्षा रक्षक, औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी औरंगाबाद
Follow us on

औरंगाबाद : अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी विविध महसूली अधिकारी प्राण पणाला लावून काम करतात. परंतु कित्येक वेळा निर्ढावलेले वाळू वाहतूक करणारे चालक थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करतात, प्रसंगी मारहाण करतात. या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता अवैध वाळू उपसा-वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदारांना बंदूकधारी सुरक्षा रक्षक मिळणार आहे. (Arm Security Guard protect revenue officer Aurangabad Collector Sunil Chavan Decision)

अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रत्येक तहसीलदाराला बंदूकधारी रक्षक मिळणार आहे. तहसीलदार आणि वाळू उपशावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना बंदुकीचे संरक्षण मिळणार आहे. लोक सेवकांवरील वाळू माफियांचे वाढते हल्ले रोखण्यासाठी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मोठा निर्णय घेतलाय.

काय म्हणाले जिल्हाधिकारी?

“वाळू आणि मुरुमाची अवैध वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. अनेक अधिकारी कारवाईसाठी जातात. पण त्यांच्यावर हल्ले होतात. त्यामुळे अधिकाऱ्यांना इच्छा असूनही कधीकधी कारवाई करता येत नाही. हे सगळं लक्षात घेऊन आम्ही एक मोठा निर्णय घेत आहोत.

अवैध गौण खनिजे आणि उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी तसंच अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलमध्ये स्वत:चा शस्त्र बदलण्याचा परवाना असलेला एक सेवानिवृत्त सैनिक नेमण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत”, असं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं.

अधिकाऱ्यांची काय प्रतिक्रिया

जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी कलेक्टर साहेबांच्या निर्णयाचं स्वागत केलंय. बंदूकधारी सुरक्षा रक्षक मिळणार असल्याने ज्यावेळी आम्ही कारवाईसाठी जाऊ, त्यावेळी आता आम्हाला चिंता नसेल. तसंच या निर्णयाने आमचं नक्कीच मनोबल वाढलं आहे, अशी प्रतिक्रिया नायब तहसीलदार अविनाश अंकुश यांनी दिली.

(Arm Security Guard protect revenue officer Aurangabad Collector Sunil Chavan Decision)

हे ही वाचा :

शेतीच्या वादातून तुफान राडा, दोन शेतकऱ्यांमध्ये शेतातच हाणामारी

औरंगाबादेत शिवसंग्रामच्या बैठकीत राडा, शिवसैनिकांनी विनायक मेटेंची बैठक बंद पाडली

मुंबईतील एका मंत्र्याच्या सांगण्यावरुन माझ्यावर गुन्हा, इम्तियाज जलील यांचा आरोप, रोख कुणाकडे?