5

औरंगाबादेत शिवसंग्रामच्या बैठकीत राडा, शिवसैनिकांनी विनायक मेटेंची बैठक बंद पाडली

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या बैठकीत शिवसैनिकांनी गोंधळ घातला (Shiv Sena workers create ruckus at Vinayak Mete's meeting in Aurangabad).

औरंगाबादेत शिवसंग्रामच्या बैठकीत राडा, शिवसैनिकांनी विनायक मेटेंची बैठक बंद पाडली
शिवसैनिकांनी विनायक मेटेंची बैठक बंद पाडली
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 3:46 PM

औरंगाबाद : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे बैठक सुरु होती. मात्र, या बैठकीत अचानक गदारोळ सुरु झाला. काही तरुण अचानक बैठकीत आले. त्यांनी जोरजोरात आरडाओरड करायला सुरुवात केली. ते विनायक मेटे यांच्याजवळ आले. भाजप सरकार असताना प्रश्न का सोडवला नाही? असा सवाल या तरुणांनी केला. या तरुणांनी ही बैठक उधळून लावली. यावेळी सभेत उपस्थित असलेले इतर नागरिक शांतपणे सर्व प्रकार बघत राहिले. विशेष म्हणजे विनायक मेटे यांच्यासमोर हा सर्व प्रकार घडला. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर कार्यकर्त्यांनी आक्रमक कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने संबंधित प्रकार निवाळण्यात आला (Shiv Sena workers create ruckus at Vinayak Mete’s meeting in Aurangabad).

नेमकं काय घडलं?

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. संबंधित बैठक ही शिवसंग्रामच्या मेळाव्या संदर्भात सुरु होती. या बैठकीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची माहिती समोर येत आहे. औरंगाबाद शहरातील पडेगाव येथे शिवसंग्रामची बैठक सुरु होती. पण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत घुसून बैठक बंद पाडली. भाजपचे सरकार असताना प्रश्न का सोडवला नाही? असा प्रश्न विचारत शिवसैनिकांनी बैठकीत गोंधळ घातला. पोलिसांनी योग्यवेळी घटनास्थळी येऊन मध्यस्थी केली. त्यानंतर विनायक मेटे देखील गाडीत बसून निघून गेले. या घटनेचे फोटो आता समोर आले आहेत (Shiv Sena workers create ruckus at Vinayak Mete’s meeting in Aurangabad).

शिवसैनिक मेटेंविरोधात आक्रमक का?

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या प्रचंड गाजतोय. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात अवैध ठरल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. भाजपचे सर्वच नेते या विषयावरुन राज्य सरकारवर टीका करत आहेत. याशिवाय शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे हे देखील या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. त्यांनी अनेकदा राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यात एकीकडे कोरोना संकट सुरु असताना गर्दी करणे योग्य नाही. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारही आग्रही असून त्याबाबत प्रयत्न सुरु आहेत, अशी सरकारची भूमिका आहे. पण तरीही विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारवर टीका केलीय. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी औरंगाबादमध्ये त्यांची बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : ‘मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे’, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Non Stop LIVE Update
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून राऊत यांचं आव्हान काय? थेट म्हणाले...
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून राऊत यांचं आव्हान काय? थेट म्हणाले...