मुंबईतील एका मंत्र्याच्या सांगण्यावरुन माझ्यावर गुन्हा, इम्तियाज जलील यांचा आरोप, रोख कुणाकडे?

'मी कुठलीही दंगल केली नाही किंवा कुठलेही शास्त्र बाळगला नाही, तरीसुद्धा माझ्यावर ते कलम लावण्यात आलंय. मात्र, त्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि इतरांना मी सांगतो की, माझ्यातला पत्रकार अजून मेला नाही. संसदेमध्ये मी या सगळ्यांना उघडे पाडेन, असा इशारा इम्तियाज जल्ली यांनी राज्य सरकारला दिलाय.

मुंबईतील एका मंत्र्याच्या सांगण्यावरुन माझ्यावर गुन्हा, इम्तियाज जलील यांचा आरोप, रोख कुणाकडे?
इम्तियाज जलील, खासदार, एमआयएम

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांच्यावर शासकीय कामात अडथळा अणल्याप्रकारणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानांना सील ठोकल्यामुळे खासदार इम्तियाज जलील हे भडकले आणि त्यांनी काल (1 जून) कामगार कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्यानंतर त्यांच्यावर ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईवर बोलताना जलील यांनी मुंबईतील एका मंत्र्याच्या सांगण्यावरून आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केलाय. ‘मी कुठलीही दंगल केली नाही किंवा कुठलेही शास्त्र बाळगला नाही, तरीसुद्धा माझ्यावर ते कलम लावण्यात आलंय. मात्र, त्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि इतरांना मी सांगतो की, माझ्यातला पत्रकार अजून मेला नाही. संसदेमध्ये मी या सगळ्यांना उघडे पाडेन, असा इशारा इम्तियाज जल्ली यांनी राज्य सरकारला दिलाय. (MP Imtiaz Jalil alleges that a case was filed against him at the behest of a minister in Mumbai)

त्याचबरोबर आगामी काळामध्ये उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील विधानसभा निवडणुकाही एमआयएम पूर्ण ताकतीने लढवणार असल्याचं जलील यांनी स्पष्ट केलं आहे. नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल हे दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दिल्लीतील दंगलीत आम आदमी पार्टीचा ही हस्तक्षेप दिसून आलाय. त्यामुळे नाण्याच्या एका बाजूला नरेंद्र मोदी आहेत तर तेच नान पलटलं तर दुसऱ्या बाजूला अरविंद केजरीवाल दिसतात, असा घणाघाती आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय.

‘मुस्लिमांना वगळून तिसरी आघाडी शक्य नाही’

बिगर काँग्रेस आणि बिगर भाजप अशा तिसऱ्या आघाडीमध्ये मुस्लिमांना वगळून आघाडी करण्याचा प्रयत्न शरद पवार करत असतील तर हे शक्य होणार नाही. उमर अब्दुल्ला आणि शरद पवार हे दोघे मिळून जर काही आघाडी करत असतील तर ती होऊ शकत नाही, असा दावाही जलील यांनी केला आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये जलील यांनी मंदिरे उघडण्यासाठी प्रयत्न केला होता. तसा प्रयत्न यावेळी करणार का? असा सवाल विचारला असता, शिवसेनेच्या नेत्यांनी मंदिरं उघडण्यासाठी प्रयत्न करावे. त्यांना शक्य नसेल तर आपण नक्की प्रयत्न करु, असा टोला जलील यांनी लगावलाय. औरंगाबादेतील शिवसेनेच्या नेत्यांनाही मंदिरं उघडणं शक्य नाही, अशा शब्दात जलील यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय.

नेमका प्रकार काय ?

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून शहरातील अनेक दुकाने सील करण्यात आली आहेत. या सील केलेल्या दुकानांना मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आला आहे. छोट्या व्यापाऱ्यांनासुद्धा मोठा दंड आकारला गेला आहे. हा दंड व्यापाऱ्यांना भरणे शक्य नाही. दंड भरणे शक्य नसल्यामुळे या दुकानदारांना आपली दुकाने सुरु करता येत नाहीयेत. याच कारणामुळे इम्तियाज जलील कामगार कार्यालयात गेले होते.

इम्तियाज जलील यांना उडवाउडवीची उत्तरं

यावेळी जलील यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. त्यावर व्यापाऱ्यांची दुकाने कमीत कमी दंडामध्ये सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी जलील यांनी कामगार कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे केली. त्या मागणीलासुद्धा उलटसुलट उत्तर मिळाली. याच कारणामुळे जलील अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती.

संबंधित बातम्या :

दुकानांना सील ठोकून हजारो रुपयांचा दंड, इम्तियाज जलील अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले

“इम्तियाज जलील दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचं काम करतो”, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा घणाघात

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI