रमजानच्या शेवटच्या आठवड्यात दुकानं उघडण्यास परवानगी द्या, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

ईदच्या शेवटच्या आठवड्यात बाजारपेठेतील दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. (mim mp imtiaz jaleel ramadan)

रमजानच्या शेवटच्या आठवड्यात दुकानं उघडण्यास परवानगी द्या, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची मागणी
imtiaz jaleel
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 3:40 PM

औरंगाबाद : रमजानच्या (Ramadan) शेवटच्या आठवड्यात बाजारपेठेतील दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केली आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेऊन त्यांनी ही मागणी केली. सध्या मुस्लीम बांधवांसाठी पवित्र असलेला रमजान महिना सुरु आहे. मुस्लीम समाजामध्ये या महिन्याला विशेष महत्त्व आहे. याच कारणामुळे जलील यांनी ही मागणी केली. (MIM MP Imtiaz Jaleel demand give permission to open shop on occasion last week of Ramadan)

नियम अटींसह दुकाने उघडी करायला परवानगी द्यावी

येत्या काही दिवसांत रमजानच्या शेवटच्या आठवड्यास सुरुवात होईल. त्यामुळे यावेळी मुस्लीम बांधवांना वेगवेगळी खरेदी करायची असते. मात्र, सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने अनेक निर्बंध लागू केलेले आहे. औरंगाबादसह इतर ठिकाणची दुकाने बंद आहेत. त्यामुळे मुस्लीम बांधवांस सामान खरेदी करण्यास अडचण निर्माण होऊ शकते. ती होऊ नये म्हणून ईदच्या शेवटच्या आठवड्यात दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी घेऊन औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेतली. या काळात नियम आणि अटी घालून दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जिलील यांनी केली.

मुस्लीम बांधवांसाठी पवित्र महिना

मुस्लिम धर्मामध्ये रमजानचा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास अर्थात रोजे ठेवतात. रमजान हा इस्लामी कॅलेंडरचा नववा महिना आहे. रमजानच्या 29-30 दिवसांदरम्यान सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाण्याचा एक थेंबही न घेता अत्यंत कडक रोजा पाळला जातो. या काळात नमाजालासुद्धा मोठं महत्व असल्याने पुढील तीस दिवस विशेष नमाजचे पठन केले जाते. या वर्षी रमजानचा महिना 12 एप्रिल 2021 (बुधवार) पासून सुरु झाला असून येत्या 13 मेला तो संपणार आहे. त्यामुळे या रमजानच्या शेवटच्या आठवड्यात बाजारपेठेतील दुकाने सुरु करावीत, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली.

रमजानचं महत्त्व काय?

मुहम्मद पैगंबर रमजानबाबत म्हणतात की या महिन्यात स्वर्गाची दारं खुली असतात आणि नरकाची दारं बंद असतात. अर्थात, इस्लामच्या माध्यमातून जीवनातील कर्तव्यपूर्ती करता येते. स्वत:ला अल्लाहपुढे समर्पित करुन त्याने दिलेल्या आदेशानुसार जगण्याचा मुस्लिम बांधव प्रयत्न करतात. मुसलमान म्हणून असणारी सर्व धार्मिक कर्तव्य पार पाडतात.

दरम्यान, जलील यांच्या या मागणीनंतर पोलीस आयुक्तांनी त्याबाबत प्रतिक्रिया दिली नसून आगामी काळात बाजारपेठा उघडण्याच्या मागणीवर काय निर्णय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

इतर बातम्या :

Ramadan 2021 | रमजानची तारीख, सेहरी आणि इफ्तारीची वेळ, जाणून घ्या रमजानचं महत्त्व…

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.