Ramadan 2021 | रमजानची तारीख, सेहरी आणि इफ्तारीची वेळ, जाणून घ्या रमजानचं महत्त्व…

मुस्लिम धर्मामध्ये रमजानचा महिना अत्यंत पवित्र मानला जातो (Ramdan Time Table In India). या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास अर्थात रोजे ठेवतात.

Ramadan 2021 | रमजानची तारीख, सेहरी आणि इफ्तारीची वेळ, जाणून घ्या रमजानचं महत्त्व...
Ramadan 2021
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 2:52 PM

मुंबई : मुस्लिम धर्मामध्ये रमजानचा महिना अत्यंत पवित्र मानला जातो (Ramdan Time Table In India). या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास अर्थात रोजे ठेवतात. रमजान हा इस्लामी कॅलेंडरचा नववा महिना आहे. रमजानच्या 29-30 दिवसांदरम्यान सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाण्याचा एक थेंबही न घेता अत्यंत कडक रोजा पाळला जातो. या काळात नमाजाला मोठं महत्व असल्याने पुढील तीस दिवस विशेष नमाजचे पठन केले जाते (Ramadan 2021 Importance And The Time Table In India For Sehri And Iftar).

यंदा रमजान बुधवारी 12 एप्रिल 2021 पासून सुरु होणार आहे आणि गुरुवारी 13 मे 2021 रोजी संपणार आहे. पण, चंद्रोदयानुसार तिथी बदली शकते. संपूर्ण एक महिना हा उत्सव राहणार आहे.

रमजानची सुरुवात चंद्राला पाहून केली जाते. रोजाची सुरुवात सेहरीने होते. सकाळच्या वेळी झोप मोडून सेहरी खाणेही इबादत असते. सेहरीसाठी काही विशेष पदार्थ नसतात. त्यानंतर दिवसभराचा उपवास केला जातो. सायंकाळी सूर्यास्तानंतर रोजा उघडला जातो. हे संपूर्ण महिनाभर सुरु असतं.

रमजानचं महत्त्व काय?

मुहम्मद पैगंबर रमजानबाबत म्हणतात की या महिन्यात स्वर्गाची दारं खुली असतात आणि नरकाची दारं बंद असतात. अर्थात, इस्लामच्या माध्यमातून जीवनातील कर्तव्यपूर्ती करता येते. स्वत:ला अल्लाहपुढे समर्पित करुन त्याने दिलेल्या आदेशानुसार जागण्याचा मुस्लिम बांधव प्रयत्न करतात. मुसलमान म्हणून असणारी सर्व धार्मिक कर्तव्य पार पाडतात.

रोजासाठी सेहरी आणि इफ्तारीचं वेळापत्रक इथे पाहा –

IslamicFinder.com नुसार –

एप्रिल 12 – पहाटे 04.34 , सायंकाळी 06:47 एप्रिल 13 – पहाटे 04.34, सायंकाळी 06:47 एप्रिल 14 – पहाटे 04:35, सायंकाळी 06:47 एप्रिल 15 – पहाटे 04:34, सायंकाळी 06:48 एप्रिल 16 – पहाटे 04:33, सायंकाळी 06:48 एप्रिल 17 – पहाटे 04:31, सायंकाळी 06:49 एप्रिल 18 – पहाटे 04:30, सायंकाळी 06:49 एप्रिल 19 – पहाटे 04:29, सायंकाळी 06:50 एप्रिल 20 – पहाटे 04:28, सायंकाळी 06:50 एप्रिल 21 – पहाटे 04:26, सायंकाळी 06:51 एप्रिल 22 – पहाटे 04:25, सायंकाळी 06:52 एप्रिल 23 – पहाटे 04:24, सायंकाळी 06:52 एप्रिल 24 – पहाटे 04:23, सायंकाळी 06:53 एप्रिल 25 – पहाटे 04:22, सायंकाळी 06:53 एप्रिल 26 – पहाटे 04:21, सायंकाळी 06:54 एप्रिल 27 – पहाटे 04:19, सायंकाळी 06:55 एप्रिल 28 – पहाटे 04:18, सायंकाळी 06:55 एप्रिल 29 – पहाटे 04:17, सायंकाळी 06:56 एप्रिल 30 – पहाटे 04:16, सायंकाळी 06:56 मे 01 – पहाटे 04:15, सायंकाळी 06:57 मे 02 – पहाटे 04:14, सायंकाळी 06:58 मे 03 – पहाटे 04:13, सायंकाळी 06:58 मे 04 – पहाटे 04:12, सायंकाळी 06:59 मे 05 – पहाटे 04:11, सायंकाळी 06:59 मे 06 – पहाटे 04:10, सायंकाळी 07:00 मे 07 – पहाटे 04:09, सायंकाळी 07:01 मे 08 – पहाटे 04:08, सायंकाळी 07:01 मे 09 – पहाटे 04:07, सायंकाळी 07:02 मे 10 – पहाटे 04:06, सायंकाळी 07:02 मे 11 – पहाटे 04:05, सायंकाळी 07:03 मे 12 – पहाटे 04:04, सायंकाळी 07:04 मे 13 – पहाटे 04:03, सायंकाळी 07:04

Ramadan 2021 Importance And The Time Table In India For Sehri And Iftar

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Shab-e-Barat 2021 | या वर्षी शब-ए-बारात कधी आहे? नेमकं काय होतं या दिवशी?, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.