दुकानांना सील ठोकून हजारो रुपयांचा दंड, इम्तियाज जलील अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले

दुकानांना सील ठोकल्यामुळे तसेच, अवाजवी दंड लावल्यामुळे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील चांगलेच भडकले आहेत. (corona pandemic aurangabad mp imtiaz jaleel)

दुकानांना सील ठोकून हजारो रुपयांचा दंड, इम्तियाज जलील अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले
IMTIAZ JALEEL


औरंगाबाद : दुकानांना सील ठोकल्यामुळे तसेच, अवाजवी दंड लावल्यामुळे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील चांगलेच भडकले आहेत. त्यांनी कामगार कार्यालयातील अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मागील अनेक दिवसांपासून औरंगाबादेत कोरोना प्रतिबंधक नियम लागू आहेत. आज त्यातील काही नियम शिथिल झाले असून लोक दुकाने सुरु करत आहेत. या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील शहरातील कामगार कार्यालयात गेले. यावेळी ते येथील अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. (amid Corona pandemic shops sealed in Aurangabad with thousand rupees of fine MP Imtiaz Jaleel got angry on government officer)

नेमका प्रकार काय ?

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून शहरातील अनेक दुकाने सील करण्यात आली आहेत. या सील केलेल्या दुकानांना मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आला आहे. छोट्या व्यापाऱ्यांनासुद्धा मोठा दंड आकारला गेला आहे. हा दंड व्यापाऱ्यांना भरणे शक्य नाही. दंड भरणे शक्य नसल्यामुळे या दुकानदारांना आपली दुकाने सुरु करता येत नाहीयेत. याच कारणामुळे इम्तियाज जालील कामगार कार्यालयात गेले होते.

इम्तियाज जलील यांना उडवाउडवीची उत्तरं

यावेळा जलील यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. त्यावर व्यापाऱ्यांची दुकाने कमीत कमी दंडामध्ये सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी जलील यांनी कामगार कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे केली. त्या मागणीलासुद्धा उलटसुलट उत्तर मिळाली. याच कारणामुळे जलील अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. त्यांनी अधिकाऱ्यांची खऱडपट्टी काढली.

पाहा व्हिडीओ :

औरंगाबादेत निर्बंध शिथिल 

दरम्यान, राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत आहे. मात्र आता रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता निश्चित नियमानुसार औरंगाबादेत आजपासून दुकाने उघडण्यात आली आहेत. शहरात सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडी ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

इतर बातम्या :

Maharashtra Coronavirus LIVE Update : वाशिम जिल्ह्यात आज आढळले 110 नवे कोरोना रुग्ण 

रुग्णसंख्या कमी होतेय म्हणून गाफील राहू नका; राजेश टोपेंचे प्रशासनाला निर्देश

मोठी बातमी ! 2018 दंगल प्रकरण, शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना 6 महिन्यांची शिक्षा

(amid Corona pandemic shops sealed in Aurangabad with thousand rupees of fine MP Imtiaz Jaleel got angry on government officer)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI