रुग्णसंख्या कमी होतेय म्हणून गाफील राहू नका; राजेश टोपेंचे प्रशासनाला निर्देश

आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. (rajesh tope and raosaheb danve hold corona review meeting in jalna)

रुग्णसंख्या कमी होतेय म्हणून गाफील राहू नका; राजेश टोपेंचे प्रशासनाला निर्देश
rajesh tope
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 7:57 PM

जालना: जालना जिल्ह्यातील कोरोनाची रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे. पण रुग्ण संख्या कमी होतेय म्हणून गाफील राहू नका, कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची सातत्याने खबरदारी घ्या, असे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज प्रशासनाला दिले. (rajesh tope and raosaheb danve hold corona review meeting in jalna)

आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत आहे. परंतु यंत्रणेने गाफील न राहता कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. शासनाने 15 जूनपर्यंत निर्बंधांमध्ये वाढ केली असून त्याचे पालनही शासनाच्या निर्देशानुसार होईल याची दक्षता घ्या. आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण 70 टक्के तर अँटीजेन चाचण्यांचे प्रमाण 30 टक्के राहील याचीही दक्षता घ्या. ग्रामीण भागामध्ये बाधित असलेले कोव्हिड केअर सेंटरमध्ये येण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे अशा रुग्णांचे समुपदेशन करून त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करा. वेळप्रसंगी पोलीस विभागाची मदत घ्या, अशा सूचना टोपे यांनी केल्या.

रुग्णांची दररोज 6 मिनिट वॉक टेस्ट घ्या

कोरोना बाधित अथवा संशयित रुणांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा प्राधान्याने मिळाव्यात. या ठिकाणची स्वच्छता दररोज होईल याकडे लक्ष द्या. तसेच रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जाही उत्तम राहील याची दक्षता घ्या. रुग्णांची दररोज 6 मिनिट वॉक टेस्ट घ्या, आदी सूचनाही त्यांनी केल्या. जिल्हा पातळीपेक्षा तालुकापातळीवर निर्बंधांचे कडकरित्या पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तालुकापातळीवर निर्बंधाची कडक अंमलबजावणी होईल, याची दक्षता घेण्यात यावी. तसेच कोरोना संशयित अथवा बाधितांना गृहविलगीकरणामध्ये न ठेवता त्यांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात यावे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता जालना जिल्ह्याला कुठल्याही बाबींची उणीव भासणार नाही यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

विनामास्क फिरणाऱ्यांना दंड करा

ग्रामीण भागात तपासणीमध्ये नागरिकांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतरही ते कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल होत नाहीत. अशावेळी नागरिकांना या आजाराचे परिणाम समजावून सांगून त्यांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात यावे. कोरोनापासून बचावासाठी मास्क, सॅनिटायजर, सामाजिक अंतराचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु अनेक नागरिक विनामास्क रस्त्यावर वावरताना दिसतात. अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. कोरोनानंतर सर्वसामान्याला म्युकर मायकोसिस आजाराचा सामना करावा लागत आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये या आजारावर मोफत उपचारासाठी समावेश करण्यात आला असून या रुग्णांकडून उपचारापोटी पैसे तर घेतले जात नाहीत ना याची तपासणी करण्यात यावी, अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.

20 रुग्णवाहिकांचे लोकार्पण

दरम्यान, टोपे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रासाठीच्या 20 रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याला रुग्णवाहिका उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीकोनातुन 500 रुग्णवाहिकांची खरेदी केली असून जालना जिल्ह्यासाठी 20 रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. जालना जिल्ह्यासाठी आणखीन रुग्णवाहिकांची आवश्यकता असून त्याही लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, कल्याण सपाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले, बप्पा गोल्डे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. (rajesh tope and raosaheb danve hold corona review meeting in jalna)

संबंधित बातम्या:

मोदी सरकारनं स्मशानं चिरेबंदी आणि गंगा मलीन केली, अशोक चव्हाण यांची केंद्रावर घणाघाती टीका

‘लोकांच्या जीवापेक्षा, गुजराती कंपनीची अधिक काळजी’, खराब व्हेंटिलेटरवरुन उच्च न्यायालयानं मोदी सरकारला फटकारलं

औरंगाबादेत ‘म्युकरमायकोसिस’चा विस्फोट, आतापर्यंत 53 बळी, रुग्णांची संख्या पावणे सहाशेवर!

(rajesh tope and raosaheb danve hold corona review meeting in jalna)

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.