मोठी बातमी ! 2018 दंगल प्रकरण, शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना 6 महिन्यांची शिक्षा

शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल (Pradeep Jaiswal) यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. (aurangabad riot shivsena mla pradeep jaiswal sentenced)

मोठी बातमी ! 2018 दंगल प्रकरण, शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना 6 महिन्यांची शिक्षा
pradeep jaiswal

औरंगाबाद : शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल (Pradeep Jaiswal) यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 20 मे 2018 रोजी औरंगाबादमध्ये दंगली झाल्यानंतर जैस्वाल यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तोडफोड तसेच पोलिसांना शिवीगाळ केली होती. याच प्रकरणी त्यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. (Shivsena MLA Pradeep Jaiswal sentenced for Six month 2018 Aurangabad riot)

नेमके प्रकरण काय आहे ?

मिळालेल्या माहितीनुसार 20 मे 2018 रोजी औरंगाबाद शहरात दंगल उसळली होती. या दंगलीमुळे औरंगाबाद शहरात तणावाचे वातवरण निर्माण झाले होते. यावेळी एकमेकांच्या विरोधात उभे असलेल्या दोन गटांनी शहरातील अनेक दुकानांची तोडफोड तसेच जाळपोळ केली होती. यामध्ये व्यापारी तसेच दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झाले होते. या प्रकरणाशी संबंधित औरंगाबाद पोलिसांनी दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

खुर्च्यांची तोडफोड, पोलिसांना शिवीगाळ

यावेळी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडण्याची आमदार प्रदीप जैस्वाल यांनी मागणी केली होती. त्यांनी शहरातील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात जाऊन खुर्च्या तसेच काचांची तोडफोड केली होती. तसेच पोलिसांना शिवीगाळसुद्धा केली होती. याच आरोपाप्रकरणी पोलीस हवालदार चंद्रकांत पोटे यांनी त्यावेळी फिर्याद दिली होती.

दरम्यान, पोटे यांनी फिर्याद दिल्यानंतर जैस्वाल यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर तब्बल तीन वर्षानंतर जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आलीये.

इतर बातम्या :

‘लोकपत्र’चे संपादक रवींद्र तहकीक हल्ला प्रकरण, पाच जणांवर गुन्हा, मुख्य आरोपी पोलिसात शरण

… तर अंगावर वर्दी ठेवणार नाही, पोलिसांना धमकी देत शिवीगाळ, औरंगाबादेत धक्कादायक प्रकार

औरंगाबादेत ‘म्युकरमायकोसिस’चा विस्फोट, आतापर्यंत 53 बळी, रुग्णांची संख्या पावणे सहाशेवर!

(Shivsena MLA Pradeep Jaiswal sentenced for Six month 2018 Aurangabad riot)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI