AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update Today : फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात वातावरणात तीव्र बदल ? असह्य उकाड्याने वैताग, कुठे पडणार पाऊस ? नागरिकांना मोठी वॉर्निंग

महाराष्ट्रात थंडी जाऊन आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे, ज्यामुळे तापमानात वाढ होऊन उकाडा जाणवत आहे. हवामान विभागाने पुढील 48 तासांत महाराष्ट्राच्या काही भागांसह मध्य भारतात पावसाची शक्यता वर्तवली आहे. वाढत्या उन्हामुळे आणि हवामानातील बदलांमुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये कमाल तापमान 32-35°C पर्यंत पोहोचेल.

Weather Update Today : फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात वातावरणात तीव्र बदल ? असह्य उकाड्याने वैताग, कुठे पडणार पाऊस ? नागरिकांना मोठी वॉर्निंग
राज्यात कसं असेल हवामान ?
| Updated on: Feb 11, 2026 | 8:59 AM
Share

इतके दिवस हवीहवीशी , सुखकर वाटणारी थंडी हळूहळू राज्यातून गायब होत चालली आहे. महाराष्ट्रात आता उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरूवात झाली आहे. सकाळी जरी थोडाफार गारवा असला तरी दिवस जसजसा वर यायला लागतो तसतसा उकाडा वाढण्यास सुरूवात होताना दिसत आहे. राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने गारठा काहीसा वाढला होता. मात्र थंडी पुन्हा कमी होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. आजपासून म्हणजेच 11 तारखेपासून राज्याच्या किमान तापमानात पुन्हा वाढ होऊ शकते, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यासोबत कमाल तापमानातही वाढ होत असल्याने उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता घामाच्या धारा वाहण्यास सुरूवात होणार आहे.

असं असलं तरीही केंद्रीय हवामानशास्त्र विभाग, आयएमडीकडून मध्य भारतासह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये पावसाचा इशाराही जारी करण्यात आला आहे. पुढील 48 तासांमध्ये केरळासह महाराष्ट्राचा काही भाहग, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणामध्ये पावसाची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

उकाडा वाढतोय घ्या काळजी

राज्यात मुंबईसह परिसरातील थंडी जवळपास पूर्णपणे नाहीशी झाली आहे. येत्या काळात वातावरणात तीव्र बदल दिसेल. सकाळी जाणवणारा गारवा आता लुप्त होत जाईल आणि दुपारी चांगलाच उकाडा जाणवेल. हवामान कोरडं आणि निरभ्र राहील. कमाल तापमान सुमारे 32 ते 35 अंश सेल्सिअसदरम्यान राहील, तर किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. पुढील काही दिवसांतही उष्णतेची तीव्रता अशीच राहू शकते.

तापमानातील चढउतार नवे नसले तरी अचानक होणाऱ्या बदलांमुळे शरीराला त्रास होऊ शकतो. तापमान वाढ सुरू झाली असून कमाल तापमान सातत्याने वर चढताना दिसेल. हळहूळ उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून उष्माही चांगलाच जाणवायला लागला आहे. त्यामुळे हवामानातील या बदलांचा आरोग्यावर होणारा परिणाम पाहता, नागरिकांनी जपून रहाव, प्रकृती, आरोग्य जपावे असा सल्ला यंत्रणांनी दिला आहे.

Follow Us
वर्धा पदवीधर मतदार संघात मविआला मोठा झटका; त्या नेत्याची बंडखोरी करत..
MVA : वर्धा पदवीधर मतदार संघात मविआला मोठा झटका; त्या नेत्याची बंडखोरी करत थेट मैदानात एंट्री
10 बाटल्या भरल्या अन् खळबळ उडाली; विहिरीतून पेट्रोलसदृश ज्वलनशील....
Sangli : 10 बाटल्या भरल्या अन् खळबळ उडाली; विहिरीतून पेट्रोलसदृश ज्वलनशील पदार्थ, व्हिडिओ बघाच
ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई
Gyanesh Kumar Hearing Update : ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई नाकारली, कारण...
लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
Chitra Wagh vs Rohit Pawar : लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच...
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच दाखवला; रोहित पवारांवर गंभीर आरोप
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप