AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elections | निवडणूक खर्च न भरल्याने पैठण तालुक्यातील 82 सोसाट्यांवर प्रशासक येणार? काय आहे खर्चाचं गणित?

औरंगाबादः ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या (Gram Panchayat Election) निवडणुकांप्रमाणेच गाव पातळीवर विविध सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकांना आता राजकीय रंग चढलेले दिसून येतात. अनेक सेवा संस्था आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय पक्षांची स्पर्धा लागलेली असते. पैठण तालुक्यात एकूण 82 सहकारी संस्था आहेत. या सर्व संस्थांची मुदत संपलेली असून त्यांच्या निवडणुका लागणे अपेक्षित होते. मात्र यापैकी एकाही संस्था किंवा […]

Elections | निवडणूक खर्च न भरल्याने पैठण तालुक्यातील 82 सोसाट्यांवर प्रशासक येणार? काय आहे खर्चाचं गणित?
प्रातिनिधिक छायाचित्र
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 16, 2022 | 3:00 AM
Share

औरंगाबादः ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या (Gram Panchayat Election) निवडणुकांप्रमाणेच गाव पातळीवर विविध सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकांना आता राजकीय रंग चढलेले दिसून येतात. अनेक सेवा संस्था आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय पक्षांची स्पर्धा लागलेली असते. पैठण तालुक्यात एकूण 82 सहकारी संस्था आहेत. या सर्व संस्थांची मुदत संपलेली असून त्यांच्या निवडणुका लागणे अपेक्षित होते. मात्र यापैकी एकाही संस्था किंवा सोसायटीने निवडणुकीसाठी निबंधक कार्यालयात पैसे भरले नसल्याने येत्या आठ दिवसात येथे प्रशासकाची नियुक्ती केली जाणार असल्याने निबंधक कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.  विविध कार्यकारी सहकारी संस्था, समिती सदस्यांच्या तसेच पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका घेण्यासाठी यंजा प्रथमच राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची (Election Authority) स्थापना करण्यात आली आहे. यापूर्वी ती स्थानिक पातळीवर घेतली जात असे. मात्र यंदा प्राधिकरणाची नेमणूक झाल्याने हा खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आहे. एवढा पैसा भरण्याची संस्थांची क्षमता नसल्याने पैठणमधील एकाही सोसायटीच्या वतीने सदस्यांसाठीचे पैसे भरलेले नाहीत. त्यामुळे येथील निवडणुका (Co operative society elections) लांबणीवर पडून येत्या आठ दिवसात प्रशासकांची नेमणूक होणार आहे.

खर्चाचं गणित काय?

पैठण तालुक्यातील 82 सहकारी संस्थांची मुदत संपली आहे. आता पुढील निवडणुकांसाठी तालुका सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करायची अनामत रक्कम निर्धारित करणे अनिवार्य आहे. मात्र एकाही संस्थेने ती रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे या सर्व संस्थांवर येत्या आठ दिवसात प्राधिकृत अधिकारी नेमण्यात येतील, असे पैठण येथील निबंधक कार्यालयाचे सहाय्यक निबंधक अनिल पुरी यांनी सांगितलं.

प्रति सभासद किती निवडणूक खर्च?

1 ते 100 सदस्यांसाठी किमान 353 रुपये, कमाल 35,300 रुपये 101 ते 300 सदस्यांसाठी किमान 198रुपये कमाल 59,400 रुपये 301 ते 500 सदस्यांसाठी किमान167रुपये कमाल 83,500 रुपये 501 ते 1000 सदस्यांसाठी किमान 144रुपये कमाल 1,44000 रुपये

सोसायट्यांची आर्थिक स्थिती बिकट

दरम्यान, पैठण तालुक्यातील विविध सहकारी सोसायट्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली असल्याने त्यांना सदस्य निवडणुकांचा खर्च भरणे अशक्य असल्याची माहिती संस्थांच्या सदस्यांनी दिली आहे. त्यामुळे आता या सर्व 82 सहकारी सोसायट्यांमध्ये प्राधिकृत अधिकारी नियुक्त केला जाऊ शकतो.

सोयगावातील 8 संस्थांच्या मतदार याद्या तयार

दरम्यान, सोयगाव तालुक्यातील 32 सेवा संस्थांपैकी आठ सेवा संस्थांच्या मतदार याद्या जिल्हा उपनिबंधक औरंगाबाद यांच्याकडे पाठवण्यात आल्या आहेत. या आठ सेवा संस्थांचा निवडणूक कार्यक्रम येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप कार्यक्रम जाहीर झाला नसल्याची माहिती सहाय्यक निबंधक ज्ञानेश्वर मातेरे यांनी दिली आहे.

इतर बातम्या-

पांढरी साडी त्यावर साजेशी गोल टिकली, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलियाचा ‘गंगूबाई’ लूक, पाहा टॉप 5 फोटो

Follow Us
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?