Suicide | ‘आपको हमारे जैसे हजारो मिलेंगे, पर…’ इन्स्टावर स्टोरी ठेवत तरुणानं का केली आत्महत्या?

Suicide | 'आपको हमारे जैसे हजारो मिलेंगे, पर...' इन्स्टावर स्टोरी ठेवत तरुणानं का केली आत्महत्या?

पाच दिवसांपूर्वी मित्राला अखेरचा फोन कॉल केल्यानंतर त्यानं हर्सूल तलावात उडी घेतली होती. तेव्हापासून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर आज 4 जानेवारी रोजी अग्निशामक दलाच्या जवानांना त्याचा मृतदेह सापडला. 

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 04, 2022 | 5:17 PM

औरंगाबादः इन्स्टाग्रामवर निराशाजनक संदेश ठेवत 18 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादेत उघडकीस आली आहे. कुणाल काकासाहेब देहाडे असं या तरुणाचं नाव आहे. पाच दिवसांपूर्वी मित्राला अखेरचा फोन कॉल केल्यानंतर त्यानं हर्सूल तलावात उडी घेतली होती. तेव्हापासून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर आज 4 जानेवारी रोजी अग्निशामक दलाच्या जवानांना त्याचा मृतदेह सापडला.

मित्रांना दिली होती कल्पना

Suicide note on instagram

इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवून तरुणाची आत्महत्या

बारावी शिकलेल्या कुणालचे वडील कंत्राटदार असल्याने तो त्यांना कामात मदत करत होता. त्याला दोन मोठे भाऊ आहेत. 1 जानेवारी रोजी तो घारातून निघाला. दुपारी मित्र-मैत्रिणींशी कॉन्फरन्सवर बोलणंही झालं. त्याने मित्राला फोन केला. माझ्यासोबत धोका झाला असून मी मुकुंदवाडी रेल्वे रुळावर आत्महत्या करत आहे, असे सांगितले. मित्रांनी तत्काळ घरी जाऊन याबद्दल माहिती दिली. सगळ्यांनी रेल्वे रुळाकडे धाव घेतली. थोड्या वेळानंतर कुणालने पुन्हा, मी हर्सूल तलावावर आलो आहे असून आता तलावात उडी घेत असल्याचे सांगितले.

पाच दिवसानंतर शोध

दरम्यान, मित्रांनी हर्सूल तलावाकडे धाव घेतली असता, तिथे त्याची दुचाकी आढळून आली. तसेच पाण्यात चप्पलही तरंगताना दिसली. सुरक्षा रक्षकाकंनी ही माहिती पोलिसांना कळवली. तेव्हापासून अग्निशामक दलाचे पथक कुणालचा शोध घेत होते. आज 4 जानेवारी रोजी त्याचा मृतदेह आढळून आला. हर्सूल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. कुणालने आत्महत्या का केलीय, याचा शोध पोलीस घेत आहेत. याकरिता मित्रांची चौकशी केली जात आहे.

इतर बातम्या-

Omicron | घाबरवणाऱ्या ओमिक्रॉनवर दिलासादायक संशोधन, नव्या विषाणूशी लढणार शरीरातील खास घटक

भाजप सेनेतील युतीचा पूल गडकरीच बांधू शकतात, दिल्लीत मंत्री अब्दुल सत्तार यांचं मोठं विधान, राजकीय चर्चांना उधाण


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें