AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अख्खं गाव लुटण्याचा बेत, हातात काठ्या, 40 घरांच्या कड्या लावल्या, पैठणमधील वडजीत शेतकऱ्याला सात लाखांना लुटलं!

तोंडोळी येथील दरोड्याच्या घटनेनंतर पैठण तालुक्यातील वडजी येथे भीषण दरोड्याची घटना घडलीय. सुदैवाने याठिकाणी कुणाच्या जीवितहानी नाही झाली तरीही गावात शिरल्यानंतर दरोडेखोरांनी तब्बल 40 घरांच्या कड्या लावून घेतल्या होत्या. पण गावकऱ्यांच्या सावधगिरीमुळे एका घरात मोठी लूट करून चोरटे पळाले.

अख्खं गाव लुटण्याचा बेत, हातात काठ्या, 40 घरांच्या कड्या लावल्या, पैठणमधील वडजीत शेतकऱ्याला सात लाखांना लुटलं!
पैठण तालुक्यात वडजी येथे मोठा दरोडा
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 13, 2021 | 7:18 AM
Share

औरंगाबादः पैठण तालुक्यातील (Paithan) वडजी गाव हे मोसंबी, डाळींब, भाजीपाला उत्पादक आणि बागायतदारांचे सधन गाव. याच वडजीवर मोठा दरोडा (Robbery)  घालण्याच्या इराद्याने शुक्रवारी दरोडेखोर गावात घुसले. त्यांनी जवळपास 40 घरांच्या दराच्या कड्या बाहेरून लावल्या. एका शेतकऱ्याच्या घरी मोठी लूट केली. पण गावकऱ्यांच्या सावधगिरीमुळे दरोडेखोरांचा हा प्रयत्न फसला. एवढ्या मोठ्या संख्येने घरांना कड्या लावून जबरी चोरी करण्याचा तालुक्यातील हा पहिलाच प्रकार आहे. त्यामुळे वडजी गावासह पैठण तालुक्यात या घटनेची जबर दहशत पसरली आहे.

शेतकऱ्याला सात लाखांना लूटले

गेल्या काही दिवसांपासून पैठण तालुक्यात चोरी आणि दरोड्याचे प्रमाण वाढले आहेत. त्यातच आता वडजी येथील भयंकर प्रकाराने अख्खा तालुका हादरला आहे. वडजी शिवारातील सखाराम दामोदर वाघमारे हे आई, दोन मुले, सून, नातू यांच्यासह राहतात. शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ते झोपी गेले असता पहाटे त्यांना जाग आली. घरात डबे वाजण्याचा आवाज आल्याने ते घरात गेले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच मागील दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी घराबाहेर जाण्याचा प्रयत्न केला असता समोरील बाजूने कडी लावल्याचे कळले. त्यामुळे त्यांनी चुलतभाऊ संतोष वाघमारे यांना फोन करून बोलावले व कडी उघडली. यावेळी त्यांना घरातील सर्वच सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा जवळपास 7 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याच कळले.

दरोड्याची गंभीर दखल, तपास सुरू

सदर घटनेची माहिती पाचोड पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे, उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. घटनेची माहिती दरोडा प्रतिबंधक पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिली. पोलीस सूत्रानुसार, एखाद्या गावात मोठ्या संख्येने घरांना कड्या लावून जबरी चोरी करण्याचा हा तालुक्यातील पहिलाच प्रकार आहे. मात्र गावातील लोक सावध झाल्याने त्यांचा प्रयत्न फसला. वडजीत चोरट्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांनी जवळपास 30-40 घरांना बाहेरून कड्या लावल्या. त्यावरून हे चोरटे किती चौकस होते, हे लक्षात येते.

इतर बातम्या-

शिवसेना आणि भाजपमधील वाद वाढणार? बॅनरबाजीतून आमदार आशिष शेलारांची खिल्ली, नितेश राणेंचं प्रत्युत्तर

Video : कोल्हापुरातील गव्याने घेतला तरुणाचा बळी, वनविभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक