AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारुची बाटली द्या, नाही तर खालीच येणार नाही, औरंगाबादेत दारूड्याचा टॉवरवरूनच धिंगाणा, अखेर…

रविवारी हे नाट्य घडल्यानंतर पुन्हा एकदा याच दारुड्यानं सोमवारी टॉवरवर चढून गोंधळ घातला. यावेळी दारूची बाटली नाही तर दारुबंदीसाठी आपण आंदोलन करत असल्याचं म्हणू लागला.

दारुची बाटली द्या, नाही तर खालीच येणार नाही, औरंगाबादेत दारूड्याचा टॉवरवरूनच धिंगाणा, अखेर...
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 24, 2022 | 9:37 AM
Share

औरंगाबादः वाईन धोरणावरून (Wine Policy) राज्य सरकारला विरोधा पक्षानं वेठीला धरलं आहे. पण औरंगाबादमध्ये (Aurangabad District) एका दारुड्यानं  दारुची बाटली मिळावी म्हणून अख्ख्या गावालाच वेठीस धरलं. तेदेखील एक नाही तर सलग दोन दिवस त्यानं हा ड्रामा केला. घरचे दारू देत नाहीत म्हणून पठ्ठ्या मोबाइलच्या टॉवरवरच (Mobile Tower) चढून बसला. कुणी तरी दारूची बाटली आणून द्या, नाही तर मी येथून खाली उडी मारेन, असा धिंगाणा सुरु केला. दारुड्याची ही अजब मागणी पाहून नागरिकांना आश्चर्य वाटू लागले. कुणाला राग आला तर कुणी त्याला वेड्यात काढू लागले. पण हा माणूस दारु द्या म्हणून हट्टालाच पेटला होता. औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड गावातली ही घटना आहे.

कुठं घडली घटना?

औरंगाबादमधील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत पाचोड येथे असलेल्या भारतीय संचार निगम लिमिटेडच्या टॉवरवर रविवारी हा माणूस चढून बसला. येथील भारतीय संचार निगमच्या कार्यालयात हे टॉवर आहे. तेथे दोन ते तीन तास या माणसाने गोंधळ घातला. दारुची बाटली द्या, तेव्हाच खाली येतो, असे म्हणू लागला. हट्टाला पेटलेल्या या माणसाचा ड्रामा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी जमली. अखेर दारू देतो, असं आश्वासन दिल्यानंतर तो खाली उतरला.

सोमवारी दारुबंदीच्या मागणीसाठी टॉवरवर

रविवारी हे नाट्य घडल्यानंतर पुन्हा एकदा याच दारुड्यानं सोमवारी टॉवरवर चढून गोंधळ घातला. यावेळी दारूची बाटली नाही तर दारुबंदीसाठी आपण आंदोलन करत असल्याचं म्हणू लागला. गावातील दारु बंद करा तेव्हा मी खाली उतरतो, असे म्हणू लागला. टॉवरच्या शेवटच्या टोकापर्यंत गेला. त्याने एवढी दारु घेतली होती की, बोलताही येत नव्हते. अखेर काही वेळाने तो खाली उतरला. मात्र दोन दिवस चाललेल्या या नाट्यामुळे बघ्यांचं मनोरंजन झालं.

इतर बातम्या-

Railway | मनमाड-नांदेड रेल्वे विद्युतीकरणाला लवकरच प्रारंभ, सेमी हाय स्पीड रेल्वेचे संकेत, मंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती

औरंगाबाद | घरकुल योजनेसेठी तीसगावातील आणखी 215 एकर जमीन मिळाली, घरे उभारण्याचा मार्ग मोकळा

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...