मनोज जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू यांचं मोठं विधान; म्हणाले, आता दोन्ही पक्षात…

मनोज जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू यांचं मोठं विधान केलं आहे. याबाबत बच्चू कडू यांनीही महायुतीबाबतही मोठा दावा केला आहे.

मनोज जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू यांचं मोठं विधान; म्हणाले, आता दोन्ही पक्षात...
bachhu kadu news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 24, 2026 | 11:47 AM

मनोज जरांगे यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपने महायुतीच्या नेत्यांमध्ये कटुता निर्माण झाली आहे. शिंदेंच्या रामदास कदम यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर भाजपचे प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांनी जोरदार पलटवार दिला आहे. परंतु ऑडिओ क्लिपवरून महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे स्पष्ट झालं आहे. एकत्र सत्ता स्थापन करणाऱ्या महायुतीबाबत आमदार बच्चू कडू यांनी धक्कादायक दावा केला आहे. आता दोन्ही पक्षात फूट पडते की काय, अशी अवस्था झाल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. कडू म्हणाले, ‘या व्यवस्थेत मलाच सर्व माहीत असल्याचा आव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता ऑडिओ क्लिपमुळे एवढा मोठा डोंगर झाला आहे की, आता दोन पक्षात फूट पडते की काय? अशी अवस्था झाली आहे. याची चौकशी केली पाहिजे. दोन्ही पक्षांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यावर नियंत्रण आणलं पाहिजे. चुकीच्या घटना पक्षात घडत असतील,  त्यावरही बंधने आणली पाहिजे. कारण देश, राष्ट्र महत्त्वाचा आहे.  आपल्या राजकारणाचा देशावर परिणाम होऊ नये’.

Loading...

‘पाचशे कोटीचा विषय छोटा नाही. ज्या काळातला व्हिडिओ आहे,  त्याचं चित्र स्पष्ट होत नाही. हा मोठेपणा आणून काही गोष्टी रंगवल्या जातात. काही जण आम्हाला सर्व माहीत असल्याचे दावा केला जात आहे.  ऑडिओ क्लिप बाहेर आणून एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. परंतु यातून भाजपचे फंडे समोर येत आहे. याचा फायदा कोणाला आहे, हे तपासले पाहिजे. महायुतीमधील नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप थांबवले पाहिजे, असं आवाहन बच्चू कडू यांनी केलं.

‘वाद हे मुद्द्यावर झाले पाहिजेत. राज्यात दुष्काळ परस्थितीत आहे लक्ष सगळे दुष्काळ कडे दिले पाहिजे. कारवाई झाली पाहिजे, या सगळ्या मागचा हेतू आहे, हे पुढे आले आहे. ही क्लिप आता का आली, मोठ्या कुठल्या नेत्यांनी दिली का? याचा तपास झाला पाहिजे. फार चुकीचे प्लॅनिंग करत असतील तर चुकीचे आहे, त्याचा निषेध करतो. राजकारणी लोक कोमल मनाची राहिलो का, असा सवाल बच्चू कडू यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us