AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed : ही निवडणूक काळी निवडणूक, ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंचा हल्लाबोल

राज्यात होणारी नगरपंचायत निवडणूक (Nagar Panchayat Election) ही काळी निवडणूक आहे. ओबीसी आरक्षणा(OBC Reservation)चा इम्पिरिकल डाटा (Empirical Data) या महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi Government)नं दिला पाहिजे, असे पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या.

Beed : ही निवडणूक काळी निवडणूक, ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
बाबासाहेब पुरंदरे यांना भाजपा नेत्या पंकजा मुंडेंकडून आदरांजली
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Dec 18, 2021 | 7:55 PM
Share

बीड : राज्यात होऊ घातलेली नगरपंचायत निवडणूक (Nagar Panchayat Election) ही काळी निवडणूक आहे. ओबीसी आरक्षणा(OBC Reservation)बद्दलचा इम्पिरिकल डाटा (Empirical Data) या महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi Government)नं दिला पाहिजे. येणाऱ्या 26 जानेवारीपासून याच अनुषंगानं महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचं वक्तव्य भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलं आहे.

‘महाराष्ट्र दौरा करणार’ आष्टी नगरपंचायत निवडणूक प्रचारसभापंकजा पुढे म्हणाल्या, की ओबीसी आरक्षणासह मराठा आरक्षणाबद्दलचाही डाटा राज्य सरकारनं दिला पाहिजे. आष्टी येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. याप्रश्नी आता महाराष्ट्र दौरा करणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. या वेळी व्यासपीठावर भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ओबीसी आरक्षणावरून टीकास्त्र राज्य सरकारनं मागच्या काही दिवसांत वेळ घालवला. आतापर्यंत काम केलं असतं तर अशी वेळ आली नसती. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होत आहेत. हा ओबीसींवर अन्याय आहे. एक तर डाटा गोळा करायला हवा होता, अन्यथा निवडणुका डाटा मिळेपर्यंत पुढे ढकलायला हव्या होत्या. असं काहीही सरकारनं केलं नाही. त्यामुळे आता होणारी ही निवडणूक काळी निवडणूक असल्याचं त्या म्हणाल्या.

‘न्याय नाही’

कालही ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंनी टीका केली होती. काल भाजपा(BJP)च्या शिष्टमंडळानं निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. ओबीसींनी ओपन(Open)मध्ये अर्ज भरले नाहीत, असे त्यांनी आयुक्तांना सांगितले. निवडणुका घ्यायच्याच असतील तर आरक्षण देऊन घ्या, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली होती. यावेळी त्यांच्यासोबत प्रवीण दरेकर(Pravin Darekar), आशिष शेलार(Ashish Shelar)ही होते.

या गुन्हेगाराची भलतीच थिअरी, घरातच लपवायचा केलेली चोरी; 37 व्या वर्षात 37 गुन्हे असलेला चोर अखेर जेरबंद

ठाण्यात फुले दाम्पत्याचे स्मारक उभारणार; महासभेत सभागृह नेत्यांचा प्रस्ताव

Attack on Shiv Sena Activist | शिवसेना कार्यकर्त्यावर कणकवलीत तलवारीनं हल्ला! हल्ल्यामागे राणेंचा हात?

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!