AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईलवर गेम खेळण्यास आई वडिलांची मनाई, 16 वर्षीय तरुणीची नदीत उडी घेत आत्महत्या

भंडारा शहराला लागून वाहत असेलल्या वैनगंगा नदीत उडी घेत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. (Bhandara Girl Suicide Mobile Game)

मोबाईलवर गेम खेळण्यास आई वडिलांची मनाई, 16 वर्षीय तरुणीची नदीत उडी घेत आत्महत्या
मोबाईल खेळण्यास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: May 28, 2021 | 10:24 AM
Share

भंडारा : आई वडिलांची मोबाईलवर गेम खेळण्यास नकार दिल्यामुळे 16 वर्षीय तरुणीने टोकाचं पाऊल उचललं. रागाच्या भरात अल्पवयीन तरुणीने वैनगंगा नदीत उडी घेत आयुष्याची अखेर केली. नदीत तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Bhandara Minor Girl commits Suicide after Parents Denies to play Mobile Game)

मोबाईलवर गेम खेळण्यास पालकांचा नकार

भंडारा शहराला लागून वाहत असेलल्या वैनगंगा नदीत उडी घेत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. भंडारा शहरातील कस्तुरबा गांधी वॉर्डमध्ये संबंधित कुटुंब राहतं. मयत तरुणी आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. तिला मोबाईलवर गेम खेळण्याची इच्छा असताना आई वडिलांनी मात्र नकार दिला.

वैनगंगा नदीत तरुणीची उडी

आई वडिलांनी केलेल्या मनाईमुळे तरुणीला राग आला. तिने थेट शहराजवळून वाहत असलेल्या वैनगंगा नदीचे तीर गाठले. रागाच्या भरात नदीत उडी घेत तिने आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

तासाभराने मृतदेह सापडला

तरुणीला नदीत उडी घेताना काही जणांनी पाहिले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत नदीपात्रात शोधमोहीम सुरु केली. एका तासानंतर नदीपात्रात तरुणीचा मृतदेह सापडला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मनमाडमध्ये तरुणीची आत्महत्या

दरम्यान, ऑनलाईन शिक्षणात येत असलेल्या अडथळ्यांच्या परिणामांना घाबरुन बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना गेल्या वर्षी मनमाडमध्ये घडली होती. घरात एकच मोबाईल आणि तीन भावंडे शिकणारे आहेत. कोरोनामुळे सरकारने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु केला आहे. मात्र एकच मोबाईल असल्याने विद्यार्थिनीला अभ्यास करण्यासाठी मोबाईल मिळत नसे. त्यामुळे आपला अभ्यास अपूर्ण राहील या भीतीने तिने विष पिऊन आत्महत्येचे पाऊल उचलले होते.

संबंधित बातम्या :

घरात तीन भावंडं, एकच मोबाईल, अभ्यास अपूर्ण राहिल या भीतीने बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

नवीन मोबाईल घेवून दिला नाही म्हणून 15 वर्षीय मुलाची आत्महत्या, पुरंदरमधील धक्कादायक घटना

(Bhandara Minor Girl commits Suicide after Parents Denies to play Mobile Game)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...