मोठी बातमी! शरद पवारांनी गेम फिरवला; एकाच वेळी उद्धव ठाकरे, शिंदे अन् राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का, वारं फिरणार?

सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्व बडे नेते प्रचार सभांमध्ये व्यस्त आहेत. एकीकडे हे सर्व सुरू असतानाच आता दुसरीकडे एकाचवेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे.

मोठी बातमी! शरद पवारांनी गेम फिरवला; एकाच वेळी उद्धव ठाकरे, शिंदे अन् राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का, वारं फिरणार?
शरद पवार
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 18, 2026 | 3:57 PM

सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात पाच जागांवर विधान परिषद निवडणुका होणार आहेत. यामध्ये मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा देखील समावेश आहे. दरम्यान मराठवाडा पदवीधर मतदारसंघ हा महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला गेला आहे. या मतदारसंघामधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने सतीश चव्हाण यांना उमदेवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे याच मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एक तर  शिवसेना ठाकरे गटाकडून एक असे दोन उमेदवार उभे आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून दिलीप घुगे यांना  निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे.

मात्र या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात असताना राजकारणात मोठं ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे, ते म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील हे चक्क राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांचा प्रचार करत आहेत.  विशेष म्हणजे या मतदारसंघात ठाकरेंचा उमेदवार असताना देखील ते शरद पवार यांच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी देखील या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार असताना देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.  अब्दुल सत्ता हे सतीश चव्हाण यांच्याऐवजी प्रतापसिंह पाटील यांचा प्रचार करत आहेत.

Loading...

दरम्यान काँग्रेसने देखील प्रतापसिंह पाटील यांनाच पाठिंबा दिला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात आली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सतीश चव्हाण यांचं पारडं जड मानलं जात आहे. परंतु आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील, शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार आणि काँग्रेसने या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचं टेन्शन वाढलं आहे. या मतदारसंघात आता सध्या तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराचं पारड जड होताना दिसत आहे. हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी एक प्रकारे मोठा धक्का ठरण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us