अखेर शरद पवारांनी डाव टाकलाच, शिवसेना ठाकरे गटाला मोठा झटका, काँग्रेसने घेतला मोठा निर्णय, मविआत वातावरण तापलं

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. याचदरम्यान आता काँग्रेसने घेतलेल्या एका निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मोठा फायदा होणार आहे.

अखेर शरद पवारांनी डाव टाकलाच, शिवसेना ठाकरे गटाला मोठा झटका, काँग्रेसने घेतला मोठा निर्णय, मविआत वातावरण तापलं
Maha Vikas Aghadi
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 16, 2026 | 4:17 PM

सध्या महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.  शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, नागपूर मतदारसंघ, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि छत्रपती संभाजीनगर मतदार संघ या पाच मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान यातील अनेक मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाल्याचं पहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी एकाच मतदारसंघातून महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघात असंच चित्र पहायला मिळत आहे, या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार असताना देखील शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार देखील रिंगणात आहे.

दरम्यान दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात देखील अशीच परिस्थिती आहे. इथे देखील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट आमने-सामने असल्याचं पहायला मिळत आहे. या पदवीधर मतदारसंघात काँग्रेस काय भूमिका घेणार?  महाविकास आघाडीमध्ये नेमका कोणाला पाठिंबा देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर काँग्रेसने आपली भूमिका जाहीर केली आहे. काँग्रेसकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. जालन्याचे खासदार कल्याण काळे यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

Loading...

नेमकं काय म्हणाले खैरे? 

कल्याण काळे यांना या पुढे लोकसभा लढवायची नाही का? कल्याण काळे यांनी कोणाला विचारून पाठिंबा दिला, असा सवालच यावेळी चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला आहे.  महाविकास आघाडीत हे निश्चित झालं होतं की मराठवाड्याची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला दिली जाईल.  त्यामुळे काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायला हवा होता, मात्र त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाठिंबा दिला. कल्याण काळे यांना शिवसेना ठाकरे गटाने मदत केली म्हणून ते निवडून आले, त्यांना आता पुढे निवडणूक लढवायची नाही का? असं खैरे यांनी म्हटलं आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us