मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाने डाव साधला, भाजपला मोठा धक्का, ज्याची भीती होती अखेर तसंच घडलं

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे भाजप नेते आता चांगलेच आक्रमक होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने मोठी खेळी खेळली आहे.

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाने डाव साधला, भाजपला मोठा धक्का, ज्याची भीती होती अखेर तसंच घडलं
भाजपला मोठा धक्का
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 18, 2026 | 7:05 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सातारा जिल्हा बँकेत शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठी खेळी करत भाजपला धक्का दिला आहे. याचबरोबर शंभूराज देसाई यांनी जिल्हा परिषद निवडणुकीचा वचपा देखील काढला आहे. सातारा जिल्हा बँकेत भाजपचे सर्वाधिक 9  संचालक असताना देखील या बँकेत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष झाले आहेत. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. सातारा जिल्हा बँकेत एकून 21 सदस्यांसाठी निवडणूक झाली. भाजपाचे सर्वाधिक 9 सदस्य निवडून आले, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 8  तर शिवसेना शिंदे गटाचे चार सदस्य निवडून आले होते. त्यामुळे अध्यक्ष भाजपाचाच होणार असा अंदाज लावला जात होता.

मात्र शंभुराज देसाई यांनी डाव साधला आहे. राष्ट्रवादीचे आठ तर शिवसेनेचे चार असं एकत्र करून देसाई यांनी बहुमताचं गणित जुळवलं, त्यामुळे या निवडणुकीत भाजपाने अध्यक्षपदाचा उमेदवारच दिला नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उदयसिंह पाटील -उंडाळकर यांची अध्यक्षपदी तर शिवसेना शिंदगे गटाचे दीपक चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.  सदस्यांची सख्या अधिक असताना देखील देसाई यांच्या खेळीमुळे भाजपला आपला अध्यक्ष निवडून आणता आला नाही. यावर प्रतिक्रिया देताना आगे आगे देखो होता है क्या? असा इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे.

Loading...

मार्च महिन्यात सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, या निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटा यांना बाजूला ठेवून भाजपचा अध्यक्ष केला होता. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडताना हाय होल्टेज ड्रामा देखील झाला होता. मतदानासाठी आलेल्या अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना अपहरणाच्या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या पायऱ्यांवरूनच अटक झाली होती. आता त्याचाच बदला शंभुराज देसाई यांनी घेतला आहे. भाजपचे सर्वाधिक सदस्य असताना देखील सातारा जिल्हा बँकेत भाजपाला दूर ठेवण्यात यश मिळवलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us