AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टिक-टॉक स्टारच्या जन्मदिनानिमित्त परळीमध्ये हजारो टिक टॉक स्टार

टिक-टॉक स्टार उर्मिला पवारच्या जन्मदिना निमित्ताने बीडमध्ये हजारो टिक टॉक स्टार परळीत एकत्र आले (Birthday celebration of Tik Tok Star).

टिक-टॉक स्टारच्या जन्मदिनानिमित्त परळीमध्ये हजारो टिक टॉक स्टार
| Updated on: Feb 08, 2020 | 6:34 PM
Share

बीड : टिक टॉक वापरत नाही, असा व्यक्ती सापडणं सध्या दुर्मिळ झालं आहे. स्वतःचं वेगळं टॅलेंट दाखवण्यासाठी अनेकजण टिक टॉकवर अक्षरशः धुमाकुळ घालत आहेत. यातूनच अनेकजण स्टारही झाले आहेत. अशीच एक टिक-टॉक स्टार उर्मिला पवारच्या जन्मदिना निमित्ताने बीडमध्ये हजारो टिक टॉक स्टार परळीत एकत्र आले (Birthday celebration of Tik Tok Star). यावेळी त्यांनी उर्मिला पवारचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला.

परळी तालुक्यातील जिरेवाडी येथे एका शेतात हा कार्यक्रम झाला. या शेतातील कार्यक्रमाला आलेली भरगच्च मंडळी पाहून इथं कुठलं साहित्य संमेलन तरी नाही ना असंच अनेकांना वाटेल. मात्र, तसलं काहीच नाही. टिक टॉक स्टार उर्मिला पवार हिचा जन्मदिन साजरा करण्यासाठी हे सर्व एकत्र आले आणि त्यांनी जिरेवाडीच्या शेतात आपलं एकप्रकारे संमेलनच भरवलं.

उर्मिलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील टिकटॉक स्टारने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. स्टार गावात आल्याचं पाहून, तरुण मुलांनी देखील इथं गर्दी केली. इथं आलेला प्रत्येकजण मोबाईल काढून टिक टॉकवर व्हिडिओ बनवत होता. सगळेच कलाकार एकमेकांचे व्हिडिओ काढण्यात दंग झाले होते. त्यामुळे उपस्थितांना टिक टॉक स्टारचा अनोखा टिक टॉक स्पेशल जन्मदिन उत्सव पाहायला मिळाला. त्यामुळे टिक टॉक स्टार उर्मिला पवारही भारावून गेली होती. उर्मिला पवारचे टिक टॉकवर 3 मिलियन (30 लाख) फॉलोअर्स आहेत.

या निमित्ताने टिक टॉकवरील स्टारने टिक टॉक सर्वसामान्यापर्यंत जावं, बीडच्या कलाकारांचा बीडमध्ये सन्मान व्हावा, टिक टॉक कलाकारांना वाव मिळण्यासाठी सरकारनं त्यांचे मेळावे आयोजित करावे, अशा मागण्या देखील करण्यात आल्या.

दरम्यान, राज्यातील सर्वात पहिला आणि मोठा मेळावा बीडच्या माजलगाव तालुक्यात भरवण्यात आला होता. त्यानंतर टिक टॉक कलावंतांना मोठी उभारी मिळाली होती. आता टिक टॉक स्टारचाही जन्मदिन साजरा करण्यासाठी टिक टॉक (Tick-Tock) कलावंत एकत्रित येत असल्यामुळे टिक टॉक कलावंतांना सुगीचे दिवस आल्याचं दिसत आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.