निवडणूक लढवण्यासाठी भाजप नगरसेवकाने तिसरं अपत्य लपवलं : शिवसेना

अहमदनगर : निवडणूक लढण्यासाठी कोण काय करेन याचा नेम नाही. अहमदनगरला भाजपचे विद्यमान नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांनी त्यांचं तिसरं अपत्य लपवलं असून, त्यांचं पद रद्द करा अशी मागणी शिवसेनेचे अर्जुन बोरुडे यांनी केली आहे. मात्र मी काही लपवलं नसून माझ्याविरुद्ध षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप वाकळे यांनी केलाय. “मला तीन अपत्ये असून तिसऱ्या अपत्याची जन्म …

, निवडणूक लढवण्यासाठी भाजप नगरसेवकाने तिसरं अपत्य लपवलं : शिवसेना

अहमदनगर : निवडणूक लढण्यासाठी कोण काय करेन याचा नेम नाही. अहमदनगरला भाजपचे विद्यमान नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांनी त्यांचं तिसरं अपत्य लपवलं असून, त्यांचं पद रद्द करा अशी मागणी शिवसेनेचे अर्जुन बोरुडे यांनी केली आहे. मात्र मी काही लपवलं नसून माझ्याविरुद्ध षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप वाकळे यांनी केलाय.

“मला तीन अपत्ये असून तिसऱ्या अपत्याची जन्म तारीख 3 एप्रिल 2001 आहे. ही माहिती मी प्रतिज्ञापत्रातही भरली आहे”, असं प्रत्युत्तर वाकळे यांनी दिलंय. येत्या 28 तारखेला महापौरपदाची निवडणूक आहे. यात भाजपाकडून वाकळे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र त्याआधीच त्यांच्या पुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.

अहमदनगरला महापौर आणि उपमहापौरांची निवडणूक 28 डिसेंबरला सकाळी 11 वाजता महानगरपालिका सभागृहात होणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीनंतर नगरकरांचे लक्ष महापौर निवडीकडे लागलंय. नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी याबाबत आदेश काढला आहे. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी  राष्ट्रवादी आणि भाजप मिळून सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा सध्या शहरात सुरु आहे. तर सर्वच राजकीय पक्षांनी सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

शिवसेनेकडून महापौरपदासाठी बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे यांची नावे चर्चेत आहेत. सध्या सर्वच पक्षाचे नगरसेवक सहलीला गेले असून थेट 28 डिसेंबरला येणार आहेत. महापालिकेत शिवसेना (24), भाजप (14), राष्ट्रवादी (18), काँग्रेस(5), बसपा(4), अपक्ष(2) असं पक्षीय बलाबल आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *